भारतात चित्रपट निर्मितीची सुरुवात झाली त्या काळी नायक स्वत:च गायचा आणि वाद्य वाजवायचासुद्धा. परंतु सर्वच नायकांच्या गळ्यात काही सरस्वती वास करीत नव्हती. नायकाचा तो विचित्र स्वर पडद्यावर फारच कर्कश वाटायचा. पुढे तंत्रज्ञानाने प्रगती केली आणि नायकाला उत्तम गळ्याचे गायक मिळाले. पण पडद्यावर गाणे उत्तम जमले तरी श्रेय मात्र नायकालाच. यातूनच मग गायकांनाही नायक व्हावेसे वाटायला लागले आणि किशोर कुमारपासून सुरू झालेली ही परंपरा आता अगदी हिमेश रेशमियापर्यंत येऊन पोहोचली आहे. ज्या गायकांच्या स्वरांना अभिनयाचा साज चढला अशा गायकांच्या नायकापर्यंतच्या या रंजक प्रवासावर एक नजर ‘तेरा सुरूर’च्या निमित्ताने...> आशा भोसलेआपल्या अविट सुरांनी जगभरातील श्रोत्यांना वेड लावणाऱ्या आशा भोसले यांनीही अभिनय केला आहे. वाचून आश्चर्य वाटेल. कारण, अनेकांना आशातार्इंच्या अभिनयाबाबत फारसे माहीत नाही. परंतु त्यांनी दिग्दर्शक महेश कोडियाल दिग्दर्शित ‘माई’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यांच्या गोड आवाजासारखाच त्यांचा अभिनयही सुंदर होता. > शंकर महादेवनआपल्या ‘ब्रेथलेस’ अल्बमने अपार लोकप्रियता मिळवणारे संगीत दिग्दर्शक व गायक शंकर महादेवन यांनीही नुकताच मराठी चित्रपटात अभिनय केला आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुकही झाले. ‘कट्यार काळजात घुसली’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातून शंकर महादेवन प्रेक्षकांपुढे आले. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयास समीक्षकांनीही दाद दिली.> मिका सिंगवेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत राहणारा इंडियन पॉप सिंगर अॅण्ड रॅपर शिवाय प्लेबॅक सिंगर मिका सिंग याने २०११ मध्ये अभिनयाच्या क्षेत्रात नशीब अजमावले. ‘लूट’ या चित्रपटात मिकाने आपल्या अभिनयाचे दर्शन घडवले. परंतु हा चित्रपट फारसा चालला नाही आणि मिकाच्या अभिनयाचे किस्सेही ‘बंद किताब की तरह’ बंदिस्तच राहिले.>>हिमेश रेशमिया‘तेरा सुरूर’ हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात झळकला. ‘आप का सुरूर’ यापाठोपाठ ‘दी रीअल लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून हिमेशने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. गायक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करत असतानाच स्वत:ला अभिनेत्याच्याही फ्रेममध्ये फिट करण्यात तो बऱ्याच अंशी यशस्वी झाला आहे. गोड गळ्यासोबतच देखणा चेहरा लाभल्याने पडद्यावरही तो छानच दिसतोय.>आदित्य नारायण‘जब प्यार किसी से होता है’ आणि ‘परदेस’ या चित्रपटात बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा, पण गायकाच्या पोटी जन्माला आलेला आदित्य नारायण हा तसा मुळात उदित नारायण यांचा मुलगा व व्यवसायाने गायक आहे. परंतु त्यालाही सिल्वर स्क्रीनने आकर्षून घेतले आणि विक्रम भट्ट यांच्या ‘शापित’ चित्रपटाद्वारे त्याने नायक म्हणून पडद्यावर एन्ट्री केली.
गायकांच्या स्वरांना अभिनयाचा साज!
By admin | Published: March 12, 2016 2:35 AM