सध्या 'सिंघम अगेन' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमांच्या यादीत 'सिंघम अगेन'ची चर्चा आहे. 'सिंघम अगेन' सिनेमाचं कथानक यावेळी रामायणाशी जोडण्यात आलंय. पण यामुळेच सिनेमाला मोठा फटका बसलाय. 'सिंघम अगेन'च्या रिलीजला अवघे तीन दिवस बाकी असताना सिनेमात मोठा बदल सुचवण्यात आलाय.
'सिंघम अगेन'मध्ये करण्यात येणार हा मोठा बदल
'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये आपण पाहिलं सध्याच्या काळाचं कथानक रामायणाशी जोडण्यात आलंय. रामायणात जसं रावण सीताहरण करतो तसंच साधर्म्य साधणारं कथानक 'सिंघम अगेन'मध्ये पाहायला मिळतंय. त्यामुळे सेन्सॉरने सिनेमाच्या टीमला सुरुवातीला Disclaimer टाकायला सांगितलं आहे. "ही कहाणी पूर्ण काल्पनिक आहे. या सिनेमाची कहाणी प्रभू श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारीत असली तरीही कोणतीही व्यक्तिरेखा प्रभू श्रीराम यांच्या रुपात बघू नये. सिनेमाच्या कहाणीत आजच्या काळातले लोक, परंपरा, समाज, संस्कृती दाखवण्यात आली आहे." असं Disclaimer देण्यात आलंय.
'सिंघम अगेन'मध्ये रामायण संदर्भ घेतल्याने झाले बदल
'सिंघम अगेन'मध्ये अनेक ठिकाणी आजच्या काळाचे प्रसंग आणि रामायणातील काही प्रसंग यांचा संबंध जोडण्याचा प्रसंग केलाय. त्यामुळे सिनेमातील रणवीर फ्लर्ट करतो तो एक सीन, करीन कपूरचे काही सीन्स अशा काही प्रसंगांवर कात्री लावण्यात आलीय. त्यामुळे जेव्हा सिनेमा रिलीज होईल तेव्हाच नक्की कोणते प्रसंग कापण्यात आलेत ते कळेल. 'सिंघम अगेन' दिवाळीच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच १ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.