- Virendrakumar Jogiएकाच आईवडिलांच्या पोेटी जन्माला आलेल्या दोन बहिणी. चेहरा, स्वभाव वेगळा. पण, स्टाइल मात्र डिक्टोसारखीच. यामागे एक प्रेमळ इर्ष्या आहे. आपली थोरली वा धाकटी बहीण दिसते तसेच आपणही दिसायला हवे. याच प्रेमळ इर्ष्येतून मग कॉपी होते स्टाइल आणि भिन्न चेहरा व स्वभावाच्या दोन्ही बहिणीत दिसायला लागते एक विलक्षण साम्यता. काय म्हणता...? उदाहरण हवे...? नूतन-तनूजा, लता-आशा किंवा आताच्या सोनम-रेहा व जान्हवी - खुशी क पूर ही त्याचीच उदाहरणे आहेत की. अशाच बॉलिवूडमधील आणखी काही स्टायलिश बहिणींची ही रंजक माहिती खास सीएनएक्सच्या वाचकांसाठी....सोनम-रेहा कपूरअनिल कपूर यांच्या सोनम व रेहा या दोन्ही मुली स्वत:च्या स्टाइलबद्दल चांगल्याच कॉन्शियस आहेत. व्यावसायिक अभिनेत्री असलेली सोनम बॉलिवूडमध्ये स्टाइल आयकॉन म्हणून ओळखली जाते तर रेहा देखील आता निर्मिती व दिग्दर्शनात पाऊल ठेवते आहे. कदाचित हे फारच कमी लोकांना माहिती असेल की, सोनमच्या स्टाइलमागे रेहाचा मोठा हात आहे. सोनमसाठीचे कपडे डिझाईन करण्याचे काम रेहा मागील कित्येक वर्षांपासून करीत आहे. सोनम व रेहा यांची स्टाइल पाहिल्यावर त्यांच्यातील साम्य मेंटेन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. दोघीही बहिणी स्टायलिश आणि एक्स्पेरीमेंटल आहेत. मलायका-अमृता अरोरा बॉलिवुडमधील सर्वांत चर्चीत फॅशन आयकॉनपैकी एक असलेली मलायका अरोरा हिची स्टाइल फॉलो करण्यासाठी सर्वांत आधी पुढाकार घेण्यात तिची बहिण अमृता अरोरा आघाडीवर आहे. कपूर सिस्टर्स यांच्या बेस्ट फ्रे ंड असलेल्या अरोरा सिस्टर्स डिझायनर मनीष मल्होत्राच्या फालोअर्स आहेत. मलायका व अमृता यांच्यात चांगलीच गट्टी आहे म्हणूनच तर दोन्ही बहिणी अनेकदा रॅम्पवर एकाच सारख्या कॉस्च्यूममध्ये एकत्र दिसल्या आहेत.शिल्पा-शमिता शेट्टी आपल्या खास स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळख मिळविणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. चंदेरी दुनियेत शिल्पाची स्टाइल सर्वाधिक फॉलो केली जाते असे म्हणतात. अनेक टीव्ही कलाकारांनी तर शिल्पाच्या स्टाइलची आॅनस्क्रीन कॉपी केली आहे. शिल्पाची लहान बहिण शमिताही तिच्या स्टाइलचा कित्ता गितविताना दिसते. दोघींना एकत्र पाहिल्यावर त्यांच्या स्टाइल व फॅशनमधील साम्य चटकन लक्षात येते. प्रियांका-परिणीती चोप्रादेसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा व अभिनेत्री परिणीती चोप्रा या सख्या बहिणी नसल्या तरी देखील दोघांमधील नाते याहून कमी नाही. प्रियांका आपल्या स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. बॉलिवूडमधील आघाडीच्या स्टायलीश दिवामध्ये तिचा समावेश होतो. प्रियांका देखील स्वत:चे स्टाइल स्टेटमेंट तयार करू पाहतेय. करिश्मा-करिना कपूर बॉलिवूडमध्ये प्रेगनेंन्सी ट्रेंडचे श्रेय मिळविणारी अभिनेत्री करिना कपूर व तिची बहीण करिश्मा कपूर यांची स्टाइल व फॅशन जबरदस्त असते. दोन्ही बहिणी जेवढ्या ग्लॅमरस आहेत तेवढेच त्याचे स्टाइल स्टेटमेंटही क्लासी असते हे सर्वांनाच ठाऊक आहे. इंडियन विअर असो किंवा वेस्टर्न फॅशन असो दोघींचे सौंदर्य यात खुलून दिसते. विशेष म्हणजे डिझायनर मनीष मल्होत्राकडून करिष्मा व करिना या दोन्ही बहिणी आपल्या स्टाइलसाठी सल्ला घेतात. याचमुळे दोघींची स्टाइल हटके असली तरी एकमेकींना पुरक असल्याचे दिसते.जान्हवी-खुशी कपूर श्रीदेवीच्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनी अद्याप बॉलिवूडमध्ये डेब्यू केला नसला तरी दोघींच्या स्टाइलची चांगलीच चर्चा आहे. श्रीदेवी आपल्या खास स्टाइलसाठी ओळखली जाते. श्रीदेवीच्या दोन्ही मुली आपल्या स्टाइलबद्दल चांगल्याच अवेअर आहेत असेच म्हणायला हवे. नुकतेच श्रीदेवी सोबत जान्हवी व खुशी यांची स्टाइल पाहिल्यावर मुलीदेखील आईच्या वळणावर पोहोचल्या आहेत असेच तुम्ही म्हणाल. आपल्या मुुलींचा ड्रेसिंग सेन्स क ॉन्ट्रास्ट ठेवण्यावर श्रीदेवीचा भर असतो. म्हणनूच दोघीही आपल्या आईसोबत असल्या तरी वेगवेगळी स्टाइल स्टेटमेंट फॉलो करीत असल्याचे जाणवते.
बहिणीने कॉपी केली बहिणीची स्टाइल!
By admin | Published: February 03, 2017 3:06 AM