Join us

आयुषमान खुराणासाठी 'ही' परिस्थिती होती लाजिरवाणी

By गीतांजली | Published: October 05, 2018 12:59 PM

आयुषमान खुराणा आजच्या घडीला इंडस्ट्रीतले मोठे नाव आहे. सिनेमात येण्यापूर्वी पाच वर्षे तो थिएटर करत होता. आयुषमान एमटीव्हीवर येणा-या रोडिज या शोच्या दुस-या सीझनचा विजेता होता.

ठळक मुद्दे'विकी डोनर’ सिनेमातून त्यांने आपल्या करिअरला सुरुवात केली सिनेमात येण्यापूर्वी त्यांने पाच वर्षे थिएटरमध्ये काम केले आहे

गीतांजली आंब्रे 

आयुषमान खुराणा आजच्या घडीला इंडस्ट्रीतले मोठे नाव आहे. सिनेमात येण्यापूर्वी त्यांने पाच वर्षे थिएटरमध्ये काम केले आहे. आयुषमान एमटीव्हीवर येणा-या रोडिज या शोच्या दुस-या सीझनचा विजेता होता. 'विकी डोनर’ सिनेमातून त्यांने आपल्या करिअरला सुरुवात केली. आतपर्यंत त्याच्या भूमिकांना लोकांनी डोक्यावर घेतले. लवकरच त्याचा 'बधाई हो' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याच्याशी केलेली ही खास बातचित  

'बधाई हो' सिनेमातील तुझी नेमकी काय भूमिका आहे?, तुझ्या भूमिकेबदल काय सांगशिल ?मी यात नकुल कौशिक नावाच्या मुलाची भूमिका साकारतो आहे. नकुल दिल्लीचा राहणारा असतो. तो मध्यवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे तर त्याची गर्लफ्रेंड श्रीमंत घरातील मुलगी असते. नुकलचं लग्न करण्याच वय झालेले असताना त्याची आई प्रेग्नेंट राहाते त्यामुळे त्याच्यासाठी ही परिस्थिती लाजिरवाणी होते. 

ही भूमिका तुझ्यापर्यंत कशी पोहोचली ?'बधाई हो'ची स्क्रिप्ट मला अमित शर्माच्या ऑफिसमध्ये ऐकली होती. सिनेमाचा लेखक अक्षतने स्टोरी सांगताच मी या भूमिकेसाठी होकार दिला होता. ही गोष्ट माझ्याबरोबर दुसऱ्यांदा झाली. याआधी 'दम लगा के हईशा' सिनेमाच्यावेळी सुद्धा स्क्रिप्ट ऐकताच मी होकार दिला होता. मी आतापर्यंत केलेल्या सिनेमांपैकी 'बधाई हो' सिनेमाची स्क्रिप्ट सर्वोत्कृष्ठ आहे. 

तू थिएटर, मालिका आणि सिनेमा या तिनही माध्यमांमध्ये काम केेले आहेस, तुला सर्वात जास्त भावलेले माध्यम कोणते व का ? माझ्या सर्वात जवळचं माध्यम सिनेमा आहे. कारण मला लहापणापासूनच अभिनेता बनायचे होते. भारतात दोनच गोष्टी सगळ्यात मोठ्या आहेत एक क्रिकेट आणि दुसरा सिनेमा. मला दोघांपैकी एक काहीतरी करायचे होते. आधी मी क्रिकेट खेळायचो तेव्हा मला वाटायचे मी क्रिकेटर होऊन मग अभिनेता बनेन क्रिकेटर नाही होऊ शकलो, पण अभिनेता झालो. 

तू कोणत्याही सिनेमात काम करताना तो सिनेमा भूमिका बघून निवडतोस कि सिनेमाची स्क्रिप्ट ?सगळ्यात आधी महत्त्वाची माझ्यासाठी सिनेमाची स्क्रिप्ट असते. स्क्रिप्ट चांगली असेल तर कोणीही दिग्दर्शक आणि चांगला निर्माता सिनेमासाठी तयार होऊ शकतो. स्क्रिप्ट हा सिनेमाचा गाभा असतो. चांगली स्क्रिप्ट मिळणे सगळ्यात अवघड असते.   

तू अंदाधुंदमधील भूमिका तुझ्या जॉनर पेक्षा खूपच वेगळी आहे, ती साकरण्यासाठी तुला काही वेगळी मेहनत घ्यावी लागली ?दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी मला या भूमिकेसाठी दृष्टीहीन व्यक्तिना भेटण्यास सांगितले होते. मी दृष्टीहीन मुलांच्या शाळेत गेलो. राहुल नावाचा मुलगा जो दृष्टीहीन असून उत्तम पियानो वाजवतो मी त्याला अनेकवेळा भेटलो. तीन महिने आम्ही वर्कशॉप केले. मी स्वत: पियानो वाजवायला शिकलो. सिनेमात मी बॉडी डबलचा वापर नाही केला. त्यामुळे ही भूमिका साकारणे माझासाठी आव्हानात्मक होते. 

तुला किशोर दांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे, त्या मागचे काही खास कारण आहे का ?किशोरदा गायचे, अभिनय करायचे आणि लिहायचे सुद्धा मीसुद्धा हे सगळं करतो. मी त्यांना माझे आदर्श मानतो. त्यांची भूमिका पडद्यावर रंगवणे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे.  ते खूप विद्वान होते आणि त्यांच्या आयुष्यात अनेक विनोदी किस्से होते, त्यामुळे त्यांची भूमिका साकारणे मला खूप इंटरेस्टिंग वाटतेय. ते फारच दिग्गज व्यक्तिमत्त्व होत. 

टॅग्स :आयुषमान खुराणाबधाई हो