बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत की, ज्याचं कायम या ना त्या पार्ट्या किंवा कार्यक्रमात दर्शन होतच असतं. अभिनयाची जबाबदारी सांभाळत या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणं हे ऐकून तुम्हालाही अप्रूप वाटेल. मात्र, यापैकी अनेक सेलिब्रिटींची अभिनयाची दुकानं सध्या बंद आहेत. ना त्यांच्याकडे कोणता सिनेमा आहे ना कोणी त्यांना सिनेमा देतंय. त्यामुळं ते सतत हा ना तो कार्यक्रम, पेज थ्री पार्ट्या, सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतात. पाहू या कोण आहेत असे रिकामटेकडे सेलिब्रिटी...दिया मिर्झा ‘रहना है तेरे दिल में’, ‘दम’ अशा एकाहून एक सिनेमातील भूमिकांनी दिया मिर्झाने रसिकांची मनं जिंकलीत. मात्र गेल्या काहीवर्षांपासून दिया मिर्झा सिनेमांपासून दूर गेलीय. तिनं या काळात कोणत्या नव्या सिनेमात काम केल्याचंही पाहिलं नाही. त्यामुळं रूपेरी पडद्यापेक्षा दियाचं सर्वाधिक दर्शन हे सामाजिक उपक्रम आणि पार्ट्यांमध्ये होत असतं. नुकतंच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दियाचं साऱ्यांना दर्शन झालं. याशिवाय एका संस्थेच्या सामाजिक उपक्रमासाठी निधी उभारण्यासाठी आयोजित कार्यक्रमालाही तिनं उपस्थिती लावली.
अभय देओल ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘शांघाई’, ‘देव डी’, ‘रांझणा’ अशा सिनेमांमध्ये अभिनेता अभय देओलनं भूमिका साकारल्या. मात्र सध्या तरी अभय कोणत्या सिनेमात काम करतोय हे ऐकिवात नाही. त्यामुळंच पेज थ्री पार्ट्यां, सिनेमा स्क्रीनिंग आणि सेलिब्रेशन पार्ट्यांमध्येच अभयच दर्शन होतं. नुकतंच एका प्रसिद्ध कंपनीच्या पाच वर्षपूर्ती निमित्त जे.डब्ल्यू.मॅरिएट हॉटेलमध्ये आयोजित सेलिब्रेशनलाही तो उपस्थित होता.
प्रीती झिंटा बॉलिवूडची डिंपल गर्ल म्हणजे प्रीती झिंटा. आजवर विविध सिनेमातील भूमिकांनी प्रीतीने रसिकांची मनं जिंकलीत. मात्र गेल्या काही वर्षात प्रीतीच्या अभिनयातील जादू कमी झालीय. त्यामुळंच की काय तिच्याकडे फारसे सिनेमा नाहीत. याच कारणामुळं तिनं आपला मोर्चा क्रिकेटकडे वळवत आयपीएल टीम खरेदी केली. मात्र तिथंही बिच्चाऱ्या प्रीती आणि तिच्या टीमला आजवर अपेक्षित यश मिळालं नाही. या सगळ्याला कंटाळून ती अखेर लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर आता तर तिच्याकडे कोणताच सिनेमा नाही. त्यामुळं कायम चर्चेत राहण्यासाठी विविध पार्टीज, स्क्रीनिंग आणि इतर कार्यक्रमांना ती हजेरी लावते. नुकतंच ह्यउडता पंजाबह्ण सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळी डिंपल गर्लचं दर्शन झालं. याआधी स्वाभिमानी मुंबईकर या पद्म पुरस्कारविजेत्यांसाठी आयोजित सोहळ्यालाही तिनं हजेरी लावली..
बिपाशा बासू-करणसिंह ग्रोव्हर हे अलोन स्टार चोरी चोरी चुपके चुपकेप्रेमात पडले आणि लग्न बंधनातही अडकले. बंगाली बाला बिपाशानं आपल्या बोल्ड आणि हॉट अंदाजानं रसिकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. मात्र आता बिपाशाची तशी जादू राहिली नाही. त्यामुळंच की काय तिच्याकडे फारसे सिनेमे नाहीत. करणचीही काही वेगळी अवस्था नाही. त्यामुळं दोघांनीही एकत्र येऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला असावा. मात्र आजही प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची त्यांची हौस काही कमी झालेली नाही. नुकतंच एका इफ्तार पार्टीत करणचं दर्शन झालं. फिल्मसिटीत आयोजित एका पुरस्कारकार्यक्रमातही हे जोडपं उपस्थित होतं. याशिवाय विविध ठिकाणी फिरायलागेल्यानंतर तिथले फोटो पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करुन चर्चेत राहण्याचाप्रयत्न हे कपल करतच असतं..
एली अवराम स्वीडिश अभिनेत्री एली अवराम सगळ्यात आधी चर्चेत आली ती बिग बॉसमधील एंट्रीमुळं. याच बिग बॉसमधील एंट्रीमुळं एलीसाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. मिकी वायरस आणि कॉमेडीयन कपिल शर्मासह किस किस किसको प्यार करुँ या सिनेमांचीही तिला लॉटरी लागली.. मात्र यानंतर एलीची अभिनयाची गाडी पुढे सरकेना. त्यामुळंच अभिनयाचं दुकान बंद झालेली एली सध्या पेज थ्री पार्टीज, स्क्रीनिंग आणि विविध कार्यक्रमांना हजेरी लावतेय. नुकतंच उडता पंजाबच्या स्पेशल स्क्रीनिंग आणि एका इफ्तार पार्टीच्या वेळी एलिचं साऱ्यांना दर्शन लाभलं.
सूरज पांचोली दबंग सलमान खानच्या कृपेनं सूरज पांचोलीचं हिरो सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं. मात्र हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला हे कुणालाही कळलं नाही. यानंतर सूरजकडे कोणत्याही सिनेमाची आॅफर नाही किंवा त्यानं कोणताही नवा सिनेमा साईन केलेला नाही. त्यामुळंच या ना त्या कार्यक्रमाला हजेरी लावून पब्लिसिटी मिळवण्याचा सूरज प्रयत्न करत असतो. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सूरजनं हजेरी लावली. याशिवाय एका इफ्तार पार्टीला आणि सरबजीत सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळीही सूरजचं दर्शन घडलं.- suvarna.jain@lokmat.com