Join us

नायक नहीं खलनायक हूँ मैं... छोट्या पडद्यावरील खंडेरायाचा नवा अंदाज....जॉन अब्राहमच्या सिनेमातून केले पदार्पण

By सुवर्णा जैन | Published: June 29, 2018 2:44 PM

‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट स्वातंत्र्य दिनी रिलीज होतो आहे. म्हणजेच, या चित्रपटाचा ‘गोल्ड’ आणि ‘यमला पगला दीवाना फिरसे’ चित्रपटांशी बॉक्सआॅफिस संघर्ष बघायला मिळणार आहे.

छोट्या पडद्यावरील जय मल्हार मालिकेत खंडेरायची भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेवर रसिकांनी भरभरुन प्रेम केलं. त्याच्या या भूमिकेमुळे तो जणू काही खरोखरच देव आहे अशाही काही प्रतिक्रिया त्याच्या फॅन्सनी व्यक्त केल्या होत्या.मात्र जय मल्हार मालिका संपल्यानंतर देवदत्त नागे काय करणार याची रसिकांना उत्सुकता होती. त्याच्या आगामी प्रोजेक्टकडे रसिकांच्या नजरा लागल्या होत्या. रसिकांची प्रतीक्षा मात्र आता लवकरच संपणार आहे. देवदत्त लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. हिंदी सिनेमातून तो रसिकांच्या भेटीला येणार आहे. सत्यमेव जयते या आगामी सिनेमातून तो रसिकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता जॉन अब्राहमचा हा सिनेमा असून नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये देवदत्तचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळतो आहे.या सिनेमातून देवदत्त खलनायक म्हणून रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. देवदत्तसह या सिनेमात आणखी एक चर्चेतला मराठमोळा चेहरा पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरसुद्धा या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. जॉन अब्राहमने या सिवेनात भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका सीरिअल किलरची भूमिका साकारली आहे. जॉनसोबतच यामध्ये मनोज वाजपेयी आणि आयशा शर्मा यांच्याही भूमिका आहेत. येत्या १५ ऑगस्टला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. मराठी रसिक आणि देवदत्त नागेच्या फॅन्सनाही या सिनेमाची प्रतीक्षा असेल. आजवर नायक म्हणून विशेषतः खंडेराया साकारत देवदत्त रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मात्र बॉलीवूड पदार्पणात खलनायकाची त्याची भूमिका रसिक कितपत स्वीकारणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. जॉनचा यापूर्वी आलेला ‘परमाणु’ हा चित्रपट. ‘परमाणु’ला बॉक्सआॅफिसवर मोठा प्रतिसाद मिळाला होता. साहजिकचं यानंतर जॉनकडून असलेल्या लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यामुळे ‘सत्यमेव जयते’च्या ट्रेलकची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर आज हा ट्रेलर रिलीज झाला.भरपूर अ‍ॅक्शन आणि ड्रामा याने रंगलेला ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट स्वातंत्र्य दिनी रिलीज होतो आहे. म्हणजेच, या चित्रपटाचा ‘गोल्ड’ आणि ‘यमला पगला दीवाना फिरसे’ चित्रपटांशी बॉक्सआॅफिस संघर्ष बघायला मिळणार आहे. १५ आॅगस्टलाच अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. याच दिवशी देओल ब्रदर्सचा ‘यमला पगला दीवाना फिर से’ही प्रदर्शित होतो आहे आणि नेमक्या याच दिवशी आता जॉनचा ‘सत्यमेव जयते’ही बॉक्सआॅफिसवर धडकणार आहे. 

टॅग्स :सत्यमेव जयते चित्रपट