Join us

मी पळून जाऊन लग्न केलेलं नाही...; सांगताना स्टेजवरच रडू लागली भाग्यश्री, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:42 IST

Bhagyashree : ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाने भाग्यश्री एका रात्रीत स्टार झाली. पण हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर वर्षभरातच तिने हिमालय दासानीसोबत लग्नगाठ बांधली. भाग्यश्री आजपर्यंत यावर कधीच बोलली नाही. पण...

भाग्यश्री ( Bhagyashree)आणि सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’  या सिनेमानं सगळ्यांनाच वेड लावलं होतं. अगदी आजही चाहते या जोडीला मिस करतात. हा रोमॅन्टिक सिनेमा भाग्यश्रीच्या करिअरचा टर्निंग प्वॉइंट ठरला.  ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाने भाग्यश्री एका रात्रीत स्टार झाली. पण हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर वर्षभरातच तिने हिमालय दासानीसोबत लग्नगाठ बांधली. भाग्यश्री आजपर्यंत यावर कधीच बोलली नाही. पण अलीकडे ‘स्टार जोडी’ (Smart Jodi show) या रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर, लग्नाबद्दल बोलताना ती इमोशनल झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

स्टार प्लस या वाहिनीने या शोचा एक प्रोमो रिलीज केला आहे. यात भाग्यश्री तिच्या लग्नाबद्दल बोलताना भावुक झालेली दिसतेय.

‘माझ्या लग्नात माझ्या कुटुंबीयांपैकी कुणीही नव्हतं. हिमालयाच्या कुटुंबातीही कुणीही नव्हतं. फक्त मी आणि हिमालय आमच्या दोघांचं लग्न होतं आणि आम्ही दोघंच लग्नात होतो. मी माझ्या लग्नाबद्दलचा निर्णय आईबाबांना सांगितल्यावर त्यांनी विरोध केला. ते शेवटपर्यंत तयार झाले नाहीत. आईवडिलांची आपल्या मुलांबद्दल काही स्वप्नं असतात. तसंच मुलांचीही काही स्वप्नं असतात. मुलांना त्यांचे निर्णय घेण्याची परवानगी पालकांनी द्यायला हवी. मुलांना त्यांचं आयुष्य जगू द्यायला हवं,’असं भाग्यश्री म्हणाली.

तेव्हा मला राग येतो...मी हिमालयसोबत पळून जाऊन लग्न केलं, असं लोक म्हणतात, मीडिया म्हणते, तेव्हा मला खूप राग यायचा. आत्ताही येतो. कारण मी पळून जाऊन लग्न केलं नव्हतं. आईवडिलांनी विरोध केला आणि मी फक्त माझा निर्णय घेतला, असं ती म्हणाली. यावेळी ती भावुक झालेली दिसली. तिला पाहून शोमधील अन्य स्पर्धकांच्या डोळ्यांतही दाटले.

टॅग्स :भाग्यश्रीस्टार प्लस