बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर (Prateik Babbar) शेवटचा मधुर भांडारकरच्या 'इंडिया लॉकडाउन'मध्ये दिसला होता. सध्या प्रतीक चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसे खास आहे. प्रतीकने आता नाव बदलले आहे. अभिनेत्याने त्याची दिवंगत आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांना श्रद्धांजली वाहण्याचे ठरवले आहे. त्याने इंस्टाग्राम हँडलमध्येही बदल केला आहे. आता तो त्याचे नाव प्रतीक पाटील बब्बर असे लिहणार आहे. अभिनेत्याने एका निवेदनात त्याचे नाव बदलण्यामागील विचार प्रक्रिया देखील शेअर केली आहे.
प्रतीक बब्बर हा दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेता राज बब्बर यांचा मुलगा आहे. प्रतीकने २००८ साली जाने तू या जाने ना या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला. आता हा अभिनेता आपले नाव बदलून चर्चेत आला आहे. 'डीएनए'नुसार, त्याने एका निवेदनात खुलासा केला की, आतापासून त्याचे नवीन नाव त्याच्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याने आपल्या या निर्णयाला 'थोडा अंधश्रद्धाळू आणि थोडे भावनिक' म्हटले आहे.
यामुळे बदललं नावप्रतीक बब्बरने स्टेटमेंटमध्ये म्हटले की, 'माझे वडील आणि माझे संपूर्ण कुटुंब, माझ्या दिवंगत आजी-आजोबांच्या आणि माझ्या दिवंगत आईच्या आशीर्वादाने, मी माझ्या नवीन ऑन-स्क्रीन पात्राला प्रतिबिंबित करण्यासाठी माझ्या आईचे आडनाव माझ्या नावात जोडण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या स्क्रीन नेमसाठी 'प्रतीक पाटील बब्बर' याचा जन्म झाला. जेव्हा माझे नाव एखाद्या चित्रपटाच्या क्रेडिटमध्ये किंवा कोठेही दिसेल तेव्हा मला ते मला, लोक आणि प्रेक्षकांना त्यांच्या विलक्षण आणि उल्लेखनीय वारशाचे स्मरण व्हावे असे मला वाटते. त्यांची प्रतिभा आणि महानतेची आठवण करून देईल.
प्रतीकला ठेवायचंय आईला नावाच्या माध्यमातून जिवंत तो म्हणाला की त्याची आई त्याच्या नावामुळे जिवंत राहील. प्रतीक म्हणाला, 'माझी आई माझ्या प्रत्येक प्रयत्नाचा एक भाग असेल ज्यामध्ये मी माझी ऊर्जा वापरतो, असे नाही की ती पूर्वी भाग नव्हती. पण माझ्या नावाचा भाग म्हणून त्यांचे आडनाव भावनांना बळ देते. या वर्षी तिने आम्हाला सोडून ३७ वर्षे पूर्ण केली, पण आम्ही तिला विसरलेलो नाही. ती कधीच विसरली जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. स्मिता पाटील माझ्या नावानेच जिवंत राहील.