हेट स्टोरी २ फेम अभिनेत्री सुरवीन चावला हिने नुकतेच एका मुलीला जन्म दिला आहे. सुरवीनने या बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुरवीनने या बाळासोबत नुकतेच फोटोशूट केले आहे. हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये असून यात सुरवीनने आपल्या मुलीला छातीशी कवटाळून घेतले आहे. हा फोटो खूप क्युट आला असून त्यावर कमेंटचा वर्षाव होतो आहे.
सुरवीन चावलाने मुलीसोबतचा फोटो शेअर करीत म्हटले की, प्रेम करणे आता समजू लागले आहे.
सुरवीनने १९ एप्रिलला मुलीला जन्म दिला. अद्याप ती एका महिन्यांची देखील झालेली नाही.
सुरवीनने मुलीच्या जन्मानंतर बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आता मला कसे वाटत आहे हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. माझ्यासाठी अनोखे फिलिंग आहे. मला वाटते की देवाने आमच्या कुटुंबावर कृपा केली आहे.
सुरवीन चावलाने २०१५ साली व्यावसायिक अक्षय ठक्करसोबत इटलीत लग्न केले होते. तिने तब्बल दोन वर्षे लग्न केल्याचे वृत्त लपवून ठेवले होते. २०१७ साली तिने सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून लग्नाचा खुलासा केला होता. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव ईवा ठेवले आहे. ईवा हा इंग्रजी शब्द असून याचा अर्थ जीवनातील आई असा आहे.
सुरवीन चावलाने आपल्या करियरची सुरूवात एकता कपूरची लोकप्रिय मालिका कसौटी जिंदगी कीमधून केली होती. या मालिकेत तिने प्रेरणा व मि. बजाज यांच्या छोट्या मुलीची भूमिका केली होती.
याशिवाय सुरवीनने हेट स्टोरी, पार्च्ड, क्रिएटर थ्रीडी यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. याशिवाय तिने काही वेबसीरिजमध्येदेखील काम केले आहे.