Join us

'...तर तो मला थिल्लरपणा वाटतो', सिद्धार्थ चांदेकरने बोल्ड सीनबद्दलचे व्यक्त केले मत

By तेजल गावडे | Published: September 05, 2021 7:00 AM

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची 'अधांतरी' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने मालिका आणि चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. सध्या तो छोट्या पडद्यावरील मालिका सांग तू आहेस नामध्ये स्वराजच्या भूमिकेत पहायला मिळतो आहे. तसेच त्यांची अधांतरी ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री पर्ण पेठे मुख्य भूमिकेत आहे. नुकतेच सिद्धार्थने वेबसीरिज, वेबफिल्ममध्ये असणाऱ्या बोल्ड सीनबद्दलचे मत व्यक्त केले आहे.

वेबसीरिज आणि वेब सिनेमात असणाऱ्या बोल्ड सीनबद्दलचे मत सांगताना सिद्धार्थ चांदेकर म्हणाला की, मी कुठल्याच बोल्ड सीनला वेगळे करून पाहू शकत नाही. त्या कलाकृतीपासून बोल्ड सीनला वेगळे कसे करून पहायचे हे मला कळत नाही. जर तो बोल्ड सीन त्या कथेचाच भाग असेल तर तो सीन बोल्ड कसा असू शकेल. जर त्या दिग्दर्शकाने, कलाकाराने तो सीन खूप उत्तमरित्या केला असेल तर तो वेगळा वाटला नाही पाहिजे. 

तो पुढे म्हणाला की, माझे मत असे आहे की त्या कथा आणि त्या पात्राचे काय म्हणणे आहे, ते पात्र वास्तविक दाखवण्यासाठी जर का एखाद्या बोल्ड सीनची गरज आहे. तर ते आहे. तर ते प्रेक्षकांच्या अंगावर येणार नाही. पण बोल्ड सीन टाकता यावे,ओटीटी वर बोल्ड सीन टाकता येतात म्हणून त्याच्या अवतीभवती स्टोरी रेखाटली जाते तेव्हा मला तो थिल्लरपणा वाटतो. अशा वेबसीरिज मला पाहावेसे वाटत नाही. 

सिटी ऑफ ड्रिम्स, सेक्रेड गेम्स, मिर्झापूर यासारख्या वेबसीरिजमधील बोल्ड सीन पाहून असे कुणी म्हणणार नाही की बोल्ड सीनसाठी ही सीरिज बनवली. जर बोल्ड सीनची गरज कथानकात असेल तर असणार आहेत. प्रेक्षक सजग, हुशार आहेत त्यांना काय पहायचे, काय नाही हे ठरवता येते, असेही तो म्हणाला.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकर