Join us

शालेय जीवनात सोहा अली खानचा हा विषय होता कच्चा, खुद्द तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 7:18 PM

सोहा अली खानने एका शोमध्ये तिच्या शालेय जीवनातील किस्सा सांगितला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सोहाने बऱ्याच मोठ्या कालावधीपासून बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे. नुकतेच तिने यंग जिनियसच्या पाचव्या भागात दिसणार आहे. ती यंग जिनियसमध्ये तीन विद्यार्थ्यांना भेटली. त्यावेळी तिने तिच्या शालेय जीवनातील किस्सा सांगितला. 

महाराष्ट्रातील मुंबईच्या जयादित्य शेट्टी आणि अवंतिका कांबळी तसेच उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या चिराग राठी यांनी गणिताच्या अतिशय कठीण प्रश्नांची सहज उत्तरे देऊन सोहाला चकित केले. कॅलक्युलेटर वापरून ही अनेक मोठे लोक सुध्दा ही गणिते सोडवू शकले नाहीत, पण या मानवी कॅलक्युलेटर्स नी काही सेकंदात आपल्या डोक्याचा वापर करून ही गणिते सहज सोडवली. एक हुशार विद्यार्थिनी असलेली सोहा अली खान सुध्दा या उत्तराने प्रभावित झाली.

या हुशार मुलांनी सोहा अली खानला आश्चर्यचकित केले. ती म्हणते“त्यांच्या कौशल्याचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. देवाने त्यांना गणितासारखा कठीण विषय सोडवण्याचे अनोखे कौशल्य प्रदान केले आहे,  त्याच बरोबर त्यांचे कष्ट ही वाखाणण्यासारखे आहेत. मला आठवतंय की जेव्हा मी सगळ्यात शेवटी गणिताचे प्रश्न सोडवले त्यावेळी मी दहावीत होते आणि त्यानंतर गणित विषय सोडण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने मी हा विषय सोडून दिला होता. मी ए ग्रेडची (हुशार) विद्यार्थीनी होते पण गणित हा माझा सर्वात कच्चा विषय होता. या वयात या मुलांची एकाग्रता आणि शिस्त नक्कीच वाखाणण्यासारखी आहे.”

सोहा अली खानची या हुशार मुलांबरोबरची चर्चा पाहण्यासाठी व त्याचा आनंद घेण्यासाठी यंग ‍जिनियसच्या पाचव्या भागात पहायला विसरू नका. 

टॅग्स :सोहा अली खान