Join us

सोहा आणि कुणाल होणार वेगळे?

By admin | Published: April 15, 2016 9:16 PM

बॉलीवूडमध्ये ब्रेकअपची जणू रांगच लागतं आहे. नुकत्याच झालेल्या फरहान-अधुना, मलायका-अरबज, रणबीर-कतरिना, हृतिक-सुझान, या जोड्या तुटल्यानंतर आता आणखी एक जोडी वेगळं होण्याच्या विचारावर येऊन धडकलीय

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १५ - बॉलीवूडमध्ये ब्रेकअपची जणू रांगच लागतं आहे. नुकत्याच झालेल्या फरहान-अधुना,  मलायका-अरबज, रणबीर-कतरिना, हृतिक-सुझान, या जोड्या तुटल्यानंतर आता आणखी एक जोडी वेगळं होण्याच्या विचारावर येऊन धडकलीय. ही जोडी म्हणजे अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान. आतापर्यंत हे कपल या सगळ्या गोष्टींपासून दूर होतं. पण आता आलेल्या या बातमीमुळे सगळीकडे चर्चा होत आहे.

जसं बॉलीवूड सिनेमांमध्ये दिसतं तशीच सोहा-कुणालच्या लव्हस्टोरीची सुरूवात झाली भेटी-गाठी, प्रेम आणि नंतर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय. जवळपास दोन वर्ष कुणाल खेमू आणि सोहा अली खान लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर अखेर गेल्या वर्षी हे जोडपं लग्नाच्या बेडीत अडकलं. पण, वर्षभरातच त्यांचं एकमेकांशी पटेनासं झाल्याचं समजतंय.

स्पॉटबॉय.कॉम या एंटरटेनमेन्टच्या वेबसाईटच्या वृत्तानुसार सोहा आणि कुणालमध्ये खटके गेल्या दोन महिन्यांपासून खटके उडू लागलेत त्यामुळे दोघांच्या नात्यातील तणावही वाढलाय. पण या अगोदर सोहा आणि कुणाल यांच्याकडे गोड बातमी असल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात होत होती. आणि त्यातच ही बातमी समोर आल्याने सोहा आणि कुणालच्या चाहत्यांना धक्का मिळाला आहे.

३७ वर्षांची सोहा ही करिअर ओरिएंटेड आहे. त्यामुळे तिला आणखी सिनेमांमध्ये काम करून करिअर करायचं आहे. आणि यासाठी ती आत्ताच आई बनण्यासाठी तयार नाही. परंतु, कुणाल आणि त्याचे कुटुंबीय मात्र यासाठी तयार नाहीत. त्यामुळेच या जोडप्यात वारंवार खटके उडत आहेत.