प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्या खासदार झाल्या आहेत. मोठ्या मताधिक्क्याने विजय प्राप्त केल्याबद्दल सोलापुरात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला. अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियानेदेखील प्रणिती शिंदे यांचं अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे.
जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखरचं महाराष्ट्राची खास कनेक्शन आहे. प्रणिती शिंदे शिखरची सख्खी मावशी आहे. शिखर हा सुशीलकुमार शिंदे यांची लेक स्मृती संजय पहाडिया यांचा मुलगा आहे. मावशीच्या विजयानंतर शिखरने एक व्हिडीओ शेअर करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. 'सोलापूरच्या जनतेने त्यांचा कौल दिला आहे', असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं. शिखरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रणिती यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा गराडा दिसून येतोय. तर त्यासर्वांना कारमधून अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत.
यासोबतच शिखरने 'Wohoooo' असे लिहतं आपला आनंद व्यक्त केला. शिखरने ही पोस्ट प्रणिती शिंदे यांना टॅगदेखील केली आहे. एवढंच नाही तर तर त्याचं बॅनरही लागलं आहे. शिखरची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. दरम्यान सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रणिती शिंदे तर भाजपाकडून राम सातपुते यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत प्रणितींनी मोठे मताधिक्क घेत विजय संपादन केले. प्रणिती शिंदे यांना ५ लाख ९२ हजार १८० मते मिळाली असून भाजपाचे उमदेवार राम सातपुते यांना ५ लाख ११ हजार ३१ मते मिळाली आहेत. प्रणिती शिंदे यांना ८१ हजार १४९ मतांची आघाडी मिळाली.
शिखर आणि जान्हवी लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जातं आहे. हे लव्हबर्ड्स अनेक ठिकाणी सोबत दिसून येतात. जान्हवी आणि शिखर वयाच्या १५ व्या वर्षापासून एकमेकांना ओळखत आहेत. 2013 पासून ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नतंर त्यांचं नातं तुटलं. तरी शिखर जान्हवीची वाट पाहत होता. अखेर जान्हवी पुन्हा शिखरकडे परत आली. आता दोघंही ऑफिशियली सोबत असल्याचं पाहायला मिळतं. जान्हवीचं तिच्या होणाऱ्या सासूसोबतही छान बाँडिंग आहे.