Join us

"काही आशीर्वाद शब्दांच्या पलीकडे असतात!", केतकी माटेगावकरची आईसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 4:38 PM

अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने तिच्या आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

२०१४ साली टाईमपास (Timepass) चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील दगडू आणि प्राजूने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या चित्रपटात प्राजूची भूमिका अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar)ने निभावली होती. केतकी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने तिच्या आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

केतकी माटेगावकर हिने इंस्टाग्रामवर आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर आई आणि मुलीने एकत्र गाणे गायले. काही आशीर्वाद शब्दांच्या पलीकडे असतात! माझ्या आईची मुलगी म्हणून जन्म घेणे हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे.  जरी ती माझ्याबाबतीत खूप स्ट्रिक्ट असली तरी आई पेक्षा पार्टनर इन क्राइम असते.

तिने पुढे म्हटले की, आई सोबतच्या माझ्या नात्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, आम्ही काहीही आणि किती ही वेळ बोलतो आणि तरीही ते पुरेसे नसते. तुमच्या आईसोबतच्या तुमच्या नात्याची सगळ्यात छान गोष्ट कोणती आहे? मला कळवा. आणि आईला ही विचारा.

केतकीची आई गायिका तर वडील हार्मोनियम वादक 

आपल्या सुरेल स्वरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी केतकी माटेगांवकर एक अभिनेत्रीदेखील आहे. 'शाळा', 'काकस्पर्श', 'तानी' अशा काही गाजलेल्या सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. तसेच, अनेक मालिकांसाठी पार्श्वगायनदेखील केले आहे. काही सिनेमांसाठीही तिने तिचा आवाज दिला आहे. केतकी आज कलाविश्वात प्रसिद्ध असून तिचे आई आणि वडीलदेखील संगीतविश्वाशी जोडलेले आहेत. तिची आई उत्तम गायिका आहे. तर, वडील हर्मोनियम वादक आहेत.

टॅग्स :केतकी माटेगावकर