2013 साली प्रदर्शित झालेल्या ‘टाइम प्लीज’ या सिनेमातील एक बालकलाकार कदाचित तुम्हाला आठवत असेल. आज ती प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्री झााली आहे. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री गिरिजा प्रभू हिच्याबद्दल. म्हणजेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेतील गौरीबद्दल. होय, गौरीची ही भूमिका गिरिजानं साकारली आहे.
27 नोव्हेंबर 2000 ला जन्म झालेली गिरीजा जेमतेम विशीत आहे. तरीदेखील तिने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेआधी अनेक चित्रपट आणि मालिकांमधून तिनं काम केलं आहे. गिरीजाने ‘टाइम प्लीज’ या सिनेमात चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलेलं आणि त्यासाठी तिला 300 रुपये मिळाले होते.
गिरिजाचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दोन्ही पुण्यात झालं. गिरिजाला लहानपणापासूनच अॅक्टिंग आणि डान्सची आवड होती. गिरिजाच्या कुटुंबातून कुणीच या क्षेत्रात नाही. मात्र गिरिजाने डान्स क्लास जॉईन केला. शिवाय उन्हाळी, सुट्टीमध्ये एका शिबिरात सहभाग घेतला. तेव्हा तिने एक नाटक केलेलं. त्या मधून तिचा अॅक्टिंग मध्ये इंटरेस्ट वाढला मग डबिंगचा गिरिजाने कोर्स केला आणि मग त्यानंतर तिने हळूहळू आॅडिशन द्यायला सुरुवात केली.
कौल मनाचा, काय झालं कळंना , सेंट मेरी मराठी मिडीयम, डॅड चिअर्स , तुझा दुरावा हे तिचे काही गाजलेले चित्रपट. याबरोबरच तिने मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका आणि एक शॉर्ट फिल्म सुद्धा केली आहे.अभिनयाबरोबरच तिला नृत्याची पण आवड आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’ या रिअॅलिटी शो मध्ये तिने भाग घेतला होता. महाराष्ट्राची श्रावण क्वीन (2019) या स्पर्धेत तिने तिसरा क्रमांक मिळवला होता.