नव्वदीच्या दशकात तिच्या आणि सलमानच्या खास नात्याची बरिच चर्चा झाली होती. पुन्हा एकदा सलमान आणि सोमी अली चर्चेत आले आहेत.
सोमी अली गेल्या काही महिन्यांपासून तिच्या नात्याविषयी बोलत आहे.आतापर्यंत दिलेल्या मुलाखतीत तिने कुठेच सलमान आणि तिच्या नात्याविषयी मनमोकळे बोलली नव्हती. मात्र पहिल्यांदाच सलमान आणि तिच्या नात्याबद्दल बोलताना तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पाकिस्तान मॉडेल आणि अभिनेत्री सोमी अली बॉलिवूडच्या बर्याच चित्रपटांमध्ये दिसली आहे.
बॉलिवूडमध्ये येण्याचे सर्वात मोठे कारण सलमान खान होते. सलमानवर लहानपणापासूनच सोमीचे क्रश होते. खरं तर मला अभिनयात बिलकुल रस नव्हता. केवळ सलमानला भेटता यावे म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि योगायोगाने संधीही मिळाली. मात्र काही सिनेमात काम केल्यानंत अचानक सिनेसृष्टीपासून दूर गेले.मी इथं बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आलेच नव्हते, मला तर फक्त सलमानसोबत लग्न करायचं होतं असेही तिने सांगितले.
सोमी अलीने पुन्हा एकदा सलमान खानबाबतच्या तिच्या नात्याविषयी मौन सोडले आहे. सोमी अलीने असा आरोप केला आहे की जेव्हा सलमान खानचे तिच्यासह अफेअर होते तेव्हा त्याने अनेकदा मला फसवल.
मी त्याच्यावर जीवापाड प्रेम केले प्रेमात मला त्याच्याकडून धोकाच मिळाला. ब्रेकअप नंतर मी सगळ्याच गोष्टीपासून दूर गेले.कारण इथे राहण्यासाठी माझ्याकडे दुसरे असे कोणते कारणही नव्हते.