Join us

विशाल ददलानी म्हणाला, गिधाडांनी बहिणभावाचे आयुष्य...;  सोना मोहपात्रा बिथरली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 3:32 PM

गायिका सोना महापात्राला विशालचे ट्वीट खटकले. मग काय, ती विशालवर चांगलीच बरसली.

ठळक मुद्देअभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा तपास करत असताना सीबीआयच्या विशेष पथकाला तपासादरम्यान अंमली पदार्थांसंबंधी रिया व सॅम्युएल यांच्यातील चॅटची माहिती मिळाली होती.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला अलीकडे ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाला. सुमारे 3 महिन्यानंतर शौविक तुरुंगातून बाहेर आला. शौविक तुरुंगातून बाहेर आल्यावर अनेकांनी त्याच्या समर्थनार्थ  ट्वीट केले. बॉलिवूडचा निर्माता तनुज गर्ग आणि संगीतकार विशाल ददलानी त्यापैकीच एक. मात्र गायिका सोना महापात्राला विशालचे ट्वीट खटकले. मग काय, ती विशालवर चांगलीच बरसली.

काय म्हणाला विशाल?

सर्वप्रथम बॉलिवूड निर्मात तनुज गर्गने रियाचा भाऊ शौविकच्या समर्थनार्थ ट्वीट केले. ‘शौविक ड्रग्जच्या खरेदी-विक्रीत सहभागी नव्हता, हे समोर यायला 3 महिने लागले. एक तरूण मुलगा जो थोड्या प्रमाणात बिड शेअर करत होता, त्याचे भविष्य उद्धवस्त केले गेले. बिनडोक लिंच मॉब मोटिवेटेड अजेंड्याला थँक्स, ’ असे ट्वीट त्याने केले. तनुजच्या या ट्वीटला रिप्लाय देत विशालनेही टिष्ट्वट केले. ‘गिधाडांनी भाऊबहिणीचे आयुष्य  उद्धवस्त केले आणि एका स्टारच्या मृत्यूला टीआरपी व राजकीय फायद्यासाठी वापरले,’ असे त्याने लिहिले.

सोना भडकली

विशालचे हे ट्वीट पाहून सोना मोहपात्रा मात्र भडकली. ‘ददलानीला रिया चक्रवर्तीसाठी वाईट वाटतेय. विशाल ददलानीचा हा न्याय तेव्हा कुठे होतो जेव्हा अनेक महिला त्याचा इंडियन आयडलचा सहकारी अन्नू मलिकविरोधात बोलत होत्या,’अशा शब्दांत तिने विशालवर निशाणा साधला.अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा तपास करत असताना सीबीआयच्या विशेष पथकाला तपासादरम्यान अंमली पदार्थांसंबंधी रिया व सॅम्युएल यांच्यातील चॅटची माहिती मिळाली होती. त्यावरून एनसीबीने तपास सुरू केला होता. या दरम्यान, एनसीबीने अंमली पदार्थांच्या दोन दलालांना वांद्रे परिसरातून अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने शौविक व सॅम्युएलला समन्स बजावले होते. त्यानंतर सॅम्युएल हा दलालांकडून अंमली पदार्थांचा साठा मिळवत होता. हे अंमली पदार्थ तो शौविकमार्फत रियाला पुरवत होता. रिया सॅम्युएल व शौविकच्या सल्ल्यानुसार ते अंमली पदार्थ सुशांतसिंहला छुप्या पद्धतीने देत होती, असे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. यामुळेच अधिक तपासासाठी एनसीबीने अटकेची कारवाई केली होती.

टॅग्स :विशाल ददलानीसोना मोहपात्रारिया चक्रवर्ती