अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) गेल्या वर्षी जून महिन्यात लग्न केलं. बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) तिने आंतरधर्मीय विवाह केला. या लग्नाला सोनाक्षीच्या कुटुंबियांचाच विरोध होता अशी चर्चाही झाली. आजकालची मुलं ऐकत नाही, स्वत:च निर्णय घेतात असं वक्तव्य शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं होतं. मात्र नंतर ते लेकीच्या आनंदात सहभागी झाले आणि दोघांना आशीर्वाद दिला. दरम्यान लग्नाची तयारी आम्ही २ आठवड्यात केली, आईवडिलांनी कोणताच हस्तक्षेप केला नाही असा खुलासा सोनाक्षीने केला आहे.
'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हा म्हणाली, "जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा कसं करायचं हे तुम्हाला कोणी सांगितलं नव्हतं. कुशचं झालं तेव्हा त्यालाही कोणी सांगितलं नव्हतं. त्यामुळे माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस कसा प्लॅन करायचा हे ठरवायची मला परवानगी असली पाहिजे. त्यांनाही ते समजलं. त्यांनी आमच्या प्लॅनिंगमध्ये हस्तक्षेप केला नाही. आम्हीच दोन आठवड्यात सगळं प्लॅन केलं. एका दिवस सगळं पार पडलं. १० फंक्शन्स वगरे असं काही नव्हतं. खूप सोयीस्कररित्या सगळं झालं. माझ्या आईने तर नंतर माझे आभार मानले. बरं झालं तू आमचं सगळं टेन्शन घेतलंस. आम्हाला काहीही करावं लागलं नाही."
दोन्ही भाऊ अजूनही नाराज?
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात आईवडील आनंदात दिसले. मात्र सोनाक्षीचे दोन्ही भाऊ गायब दिसले. दोघंही लग्नात होते मात्र कोणत्याच फोटोत आले नाहीत. नंतर सोनाक्षी आणि जहीरच्या रिसेप्शन पार्टीतही ते आले नाहीत. इतकंच नाही तर शत्रुघ्न सिन्हा यांच्या वाढदिवसाला सोनाक्षी आणि जहीर आलेले असता तिने फॅमिली फोटो शेअर केला यातही लव-कुश दिसले नाहीत.
कशी झाली भेट?
2022 साली 'डबल XL' सिनेमात स्क्रीन शेअर केली होती. तेव्हापासूनच दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. जहीरचे वडील इकबाल रतनसी हे सलमान खानचे मित्र आहेत. तसंच ते व्यापारी आहेत. जहीरही वडिलांचा बिझनेस सांभाळतो. तसंच तो अभिनय क्षेत्रातही आहे.