सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इकबाल (Zaheer Iqbal) हे न्यूलीवेड कपल सध्या लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांनी कुटुंबाच्या साक्षीने रजिस्टर मॅरेज केले. नुकतंच सोनाक्षीने एक व्हिडिओ स्टोरीवर शेअर केला आहे. यामध्ये जहीर इकबालच्या एका कृतीमुळे तिने त्याला 'ग्रीन फ्लॅग' असं म्हटलं आहे. सोनाक्षीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोनाक्षीने शेअर केलेल्या व्हिडिओत ती अनवाणी चालताना दिसत आहे. तर पुढे जहीर इकबाल चालत आहे. जहीरच्या हातात सोनाक्षीच्या चपला आहेत. जहीरला माहित नसताना सोनाक्षी व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागते. जेव्हा तो मागे बघतो तेव्हा त्यालाही हसू येतं. सोनाक्षीने व्हिडिओसोबत लिहिले, 'जेव्हा तुम्ही सर्वात ग्रीन फ्लॅगशी लग्न करता' असं म्हणत तिने नवऱ्याचं कौतुक केलं आहे.
सोनाक्षी आणि जहीरच्या वेडिंग रिसेप्शनलाही अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सोनाक्षी यावेळी भावूक झाली असताना अभिनेत्री काजोलने तिला आधार दिला. काजोलने कपलसोबत सेल्फीही काढला. शिवाय तब्बू, अनिल कपूर, सायरा बानो, रेखासह अनेक सेलिब्रिटींनी रिसेप्शनला हजेरी लावली होती. सोनाक्षी आणि जहीर गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी 'डबल XL' सिनेमात एकत्र कामही केलं. सध्या दोघंही मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहेत.