मराठी वाहिन्यांवरील पुरस्कार सोहळ्यात हिंदी गाण्यांवर थिरकणारे मराठी कलाकार तुम्ही पाहिले असतीलच. यावर अनेकदा टीका होते. पण याविरोधात बोलण्याची वा याला विरोध करण्यात फार कुणी धजावत नाही. पण अभिनेत्री व डान्सींग क्वीन सोनाली कुलकर्णी अपवाद निघाली. होय, मराठी भाषेवरच्या प्रेमाखातर सोनालीने काय करावे तर, यापुढे मराठी सोहळ्यात हिंदी गाण्यांवर नृत्य न करण्याचा निर्णय जगजाहिर केला. सध्या सोनालीच्या या निर्णयानंतर सर्वस्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.सोनाली कुलकर्णी ‘डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुललार्ज’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून आहे. याच शोमध्ये सोनालीने मराठी कार्यक्रमांममध्ये हिंदी गाण्यांवर नृत्य न करण्याचा तिचा निर्णय जगजाहिर केला.
याआधीही सोनालीने या निर्णयाची वाच्यता केली होती. एका चाहत्याला रिप्लाय करताना तिने हा निर्णय सांगितला होता. याबाबतचे वृत्त व्हायरल झाले असता एका चाहत्याने खुद्द सोनालीलाच याबाबत विचारले होते. ‘मराठी वाहिनीवरील पुरस्कार सोहळा कार्यक्रमात हिंदी गाण्यांवर नृत्य करणे बंद केले आहे. यापुढेही करणार नाही, ही बातमी खरी असेल तर तुम्हाला शुभेच्छा,’असे एका युजरने सोनालीच्या अकाऊंटवर कमेंट बॉक्समध्ये लिहिले होते. यावर ‘केव्हाच केलंय,’असे उत्तर सोनालीने दिले होते.तेव्हाही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.
सोनालीने यावर्षी साखरपुडा करत चाहत्यांना गोड बातमी दिली होती. कुणाल बेनोडेकरशी सोनालीचा दुबईत साखरपुडा पार पडला.सोनालीचा होणारा नवरा कुणाल हा कामानिमित्त दुबईत राहतो. कुणाल हा मूळचा लंडनचा असून तो दुबईत एएस इंटरनॅशनलमध्ये काम करतो.
कुणालचे शिक्षण लंडनमधल्या मर्चंट्स टेलर स्कूलमध्ये झाले असून त्याच्या फेसबुक अकाऊंटला आपल्याला त्याचे अनेक फोटो पाहायला मिळतात.