Join us  

Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णी झाली गायिका, ‘अप्सरे’च्या आवाजातील ‘तमाशा लाईव्ह’ नवं गाणं ऐकलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 11:27 AM

Sonalee Kulkarni, Tamasha Live : होय, सोनालीच्या आवाजातील ‘तमाशा लाईव्ह’ या आगामी चित्रपटातील ‘कडकलक्ष्मी’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. 

महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीच्या (Sonalee Kulkarni) अभिनयावर चाहते फिदा आहेत. सोनालीनं आत्तापर्यंत एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या. आता सोनाली गायिकाही झाली आहे. होय, आत्तापर्यंतच्या फिल्मी करिअरमध्ये पहिल्यांदा सोनालीनं आपल्या पात्रासाठी पार्श्वगायन केलं आहे. होय, तिच्या आवाजातील ‘तमाशा लाईव्ह’ ( Tamasha Live) या आगामी चित्रपटातील ‘कडकलक्ष्मी’  (Kadaklakshmi) हे गाणं प्रदर्शित झालं आहे. 

‘कडकलक्ष्मी’ या गाण्याला क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केलं असून या गाण्याला पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. खास म्हणजे हे गाणे सोनाली कुलकर्णी हिनेच गायलं आहे. ‘कडकलक्ष्मी’हे कडक गाणं रिलीज झालं असून   यात सोनाली कुलकर्णी आक्रमक स्वरूपात तिची व्यथा व्यक्त करत आहे.आपल्याच चित्रपटातील आपल्याच पात्रासाठी पार्श्वगायन करण्याची संधी मिळाल्यानं सोनाली जाम खूश्श आहे. तिनं  एका पोस्टद्वारे हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

‘पहिल्यांदाच सिनेमातल्या आपल्या पात्रासाठी पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली आणि ती देखील अशा गाण्यासाठी... स्वत:ला सिद्ध करू पाहणाºया प्रत्येक मुलीच्या मनातलं.. जेव्हा स्त्री कडकलक्ष्मीचं रूप घेते,’ अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. संगीतातून कथा सांगणारा ‘तमाशा लाईव्ह’ हा पहिला मराठी चित्रपट आहे. संजय जाधव यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळावेगळा प्रयोग सादर केला आहे.  

प्लॅनेट मराठी, माऊली प्रॉडक्शन, एटीएट पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बदार्पूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा तोलमारे, समीर केळकर, अजय उपर्वात सहनिर्मित या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या 15 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीसिनेमा