कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब सोनाली हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.सोनाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे अस्तित्वच निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीच अॅक्टिव्ह असते.
ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.पण तुम्हाला माहिती आहे का अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी हुबेहुब तिच्या आईसारखीच दिसते. आईची कार्बन कॉपी असल्याचे फोटो पाहून तुम्हालाही वाटेल. सोनाली कुलकर्णी अनेकदा तिच्या कुटुंबासह फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा कुटुंबासह खास क्षणाचे सेलिब्रेशन करताना दिसते. बाप लेकीचं नातं घट्ट आणि तितकंच प्रेमळ असतं हे साऱ्यांनाच माहिती आहे. सोनालीचं आईसोबतचं नातंही याला अपवाद नाही. सोनाली आपल्या जीवनात आईचं काय महत्त्त्व आहे आणि तिच्यावर आपलं किती प्रेम आहे हे सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळाले आहे.
आई बाबांची लाडकी लेक सोनाली कुलकर्णी काही महिन्यांपूर्वीच कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली आहे. गेल्याच वर्षी लॉकडाऊनमध्ये कुटुंबाच्या उपस्थितीत तिने साखरपुडा केला होता. साखरपुडाची आनंदाची बातमी तिने चाहत्यांसह शेअर करत तिच्या चाहत्यांना धक्काच दिला होता. त्यामुळे सोनालीचे लग्न झाल्याचे कळताच तिच्या चाहत्यांचाही नक्कीच हार्टब्रेक झाले असणार हे मात्र नक्की.
सोनाली कुलर्णी पती कुणाल बेनोडकेरसह दुबईत राहते. तिथल्याही अनेक घडामोडी शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सोनाली लग्नानंतर काय सुरु आहे या गोष्टी जाणून घेणा-या तिच्या चाहत्यांना तिच्या सोशल मीडिया पेजवर त्याची उत्तर नक्कीच मिळतील. सोनालीचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्याही प्रचंड आहे.