Join us

म्हणून सोनाली ब्रेंद्रेनं व्यक्ती केली चिंता, शेअर केला हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 10:42 AM

सोनालीने ट्विटरवर एक फोटो शेअर करत ही चिंता व्यक्त केली आहे.

सरकारने  पर्यावरण रक्षणासाठी ‘पीओपी’च्या मूर्तींऐवजी मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उत्सवात पूजनासाठी वापरण्याचे आवाहन केले होत. मात्र त्यास सर्वत्र अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे गणेश विसर्जनानंतर हळूहळू स्पष्ट होतंय. पर्यावरणप्रेमी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत जनजागृती करण्याचा पर्यंत करतायेत. मात्र त्याला हवा तसा प्रतिसाद अद्याप मिळत नसल्याचे दिसून येतंय. बाप्पांच्या विसर्जनानंतर चौपट्यांची स्थिती अत्यंत वाईट असते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पाच दिवसांच्या विसर्जनानंतर एक फोटो ट्विटरवर शेअर करत सोनाली बेंद्रेने चिंता व्यक्त केली आहे.

सोनालीने शेअर केलल्या या फोटोत विसर्जन केलेल्या गणपतीच्या बाप्पाच्या मुर्ती पुन्हा किनाऱ्यावर आलेल्या दिसतायेत. याचबरोबर समुद्रातून निर्माल्य, प्लॉस्टिक सगळंच किनाऱ्यावर वाहुन आल्याचे दिसतेय. या फोटोला सोनालीने एक कॅप्शन दिले आहे, ''कालच्या विसर्जनानंतर आपल्याला काही नुकसान झाल्याचे चिन्ह दिसत नसतील तर मला माहित नाही याहुन काय वेगळं असेल. मात्र आपल्याला यावर काही तरी नीट योजना आखली पाहिजे.'' अशा आशयाचे ट्विट सोनालीने केलं आहे. 

कॅन्सरला मात करुन सोनाली भारतात परतली आहे.  जुलै २०१८ मध्ये सोनालीला कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. कर्करोगाच्या निदानानंतर सोनाली उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाली होती. कर्करोगाशी लढताना इतरांना प्रेरणा देण्यासाठी सोनालीने कायमच तिचा हा प्रवास सामाजिक माध्यमांवर शेअर केला होता.

टॅग्स :सोनाली बेंद्रे