Join us

सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 9:50 AM

Sonali bendre: सोनालीने तिच्या कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासावर भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वाचण्याचे चान्स फक्त ३० टक्के होते असं सांगितलं.

'हम साथ साथ है', 'दिलजले', 'सरफरोश' यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे (sonali bendre). उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर सोनालीने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. परंतु, मध्यंतरीचा काळ तिच्यासाठी फार कठीण होता. २०१८ मध्ये सोनालीला कॅन्सर असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे मृत्युच्या दारातून सोनाली परत आली असून तिने तिचा अनुभव नुकताच शेअर केला आहे. सोनालीच्या जगण्याचे चान्स फक्त ३० टक्के होते. परंतु, या सगळ्या परिस्थितीला ती मोठ्या धीराने सामोरी गेली.

सध्या सोनाली 'द ब्रोकन न्यूज 2' या सीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजच्या निमित्ताने अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासावर भाष्य केलं. अलिकडेच तिने शुभांकर मिश्राला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वाचण्याचे चान्स फक्त ३० टक्के होते असं सांगितलं.

'माझ्याकडून भूमिका काढून घेतल्या; अंडरवर्ल्डच्या दबावामुळे सोनाली बेंद्रेने गमावले चित्रपट

"ज्यावेळी हे सगळं घडलं त्यावेळी मी एक रिअॅलिटी शो करत होते. प्रत्येक आठवड्यात या शोचं शुटिंग करावं लागायचं. त्यावेळी मला सतत जाणवत होतं की मला आतून (शरीरात) काहीतरी होतंय. त्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि मला कळलं की मला कॅन्सर झालाय. मला वाटलं माझी फर्स्ट स्टेज असेल पण जसजशा टेस्ट करत गेलो आम्हाला कळलं की, कॅन्सर माझ्या सगळ्या शरीरात पसरलाय. हे कळल्यावर माझ्या डॉक्टरांच्या आणि नवऱ्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता", असं सोनाली म्हणाली.

नवऱ्यासोबत झालं भांडण

पुढे ती म्हणते, "मला कॅन्सर झालाय हे मी मानायलाच तयार नव्हते. मी सरळ घरी गेले आणि झोपले. पण, झोपेतून उठल्यानंतरही काहीही बदललं नव्हतं. माझ्या नवऱ्याने (गोल्डी बहल) लगेच निर्णय घेतला की येत्या २ दिवसात आम्हाला विदेशात जायचंय. या निर्णयामुळे मी त्याच्याशी भांडत होते. कारण, माझा मुलगा रणवीर समर कॅम्पसाठी आऊट ऑफ टाऊन होता. त्याला म्हटलं थांब जरा मला थोडा वेळ देत. पण, इतर सगळ्या गोष्टींचा विचार करणं बंद कर आणि स्वत:कडे लक्ष दे. जगायचंय तुला असं तो (गोल्डी बहल) म्हणाला."

डॉक्टरांवर संतापली सोनाली

ज्यावेळी माझ्या जगण्याचे चान्सेस फक्त ३० टक्के होते तेव्हा मी कॅन्सरशी लढा द्यायला सुरुवात केली. मी माझ्या डॉक्टरांशी सतत वाद घालत होते की, हे सगळं कसं काय शक्य होईल. पण नंतर लक्षात आलं की ते जे सांगत होते तेच सत्य होतं.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाकर्करोग