Join us  

सोनाली बनली शेफ

By admin | Published: April 25, 2017 11:54 PM

सोनाली बनली शेफ हे ऐकून सोनाली कुलकर्णी अभिनय सोडून नव्या व्यवसायाकडे वळली आहे, असेच तुम्हाला वाटले असेल. पण असे काहीही नाही.

सोनाली बनली शेफ हे ऐकून सोनाली कुलकर्णी अभिनय सोडून नव्या व्यवसायाकडे वळली आहे, असेच तुम्हाला वाटले असेल. पण असे काहीही नाही. अभिनय हे कधीही सोनालीसाठी पहिले प्रेम आहे. पण त्याचसोबत ती आता एक शेफदेखील बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनाली तिच्या टिवटरच्या अकाऊंटवर जेवण बनवतानाचे व्हिडिओ पोस्ट करीत आहे. या पोस्टना तिच्या फॅन्सचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सध्या सगळीकडेच प्रचंड उन्हाळा वाढला आहे. त्यामुळे उन्हात थंड ज्युस प्यावेत, असे सगळ्यांना वाटते. हे थंड ज्युस कशा पद्धतीने बनवायचे, हे ती तिच्या फॅन्सना सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकवत आहे. त्यातील एक रेसिपी तर तिने तिच्या आईकडून शिकलेली असल्याचेही म्हटले आहे. या सगळ्या रेसिपींचे चित्रीकरण हे सोनालीच्याच घरातील किचनमध्ये केले आहे, असेच हे व्हिडिओ पाहताना दिसत आहे. सोनाली या व्हिडिओत भाजी चिरण्यापासून ते ज्युसचा ग्लास सजवण्यापर्यंत सगळे काही करताना आपल्याला दिसत आहे.