Join us

सोनाली खरेने शेअर केला ब्लॅक अँड व्हाईट, दिसतेय स्टनिंग अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 15:18 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. सोनालीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट शेअर केलं आहे. यात सोनाली खूपच स्टनिंग दिसतेय. सोनालीच्या चाहत्यांनी ही तिच्या फोटोशूटला भरभरुन दाद दिली आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोवर करण्यात आला. 

मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केलेला अभिनेता बिजय आनंदसोबत सोनालीने लग्न केले आहे.बिजय आणि सोनाली यांची भेट 'रात होने को है' या मालिकेदरम्यान झाली होती. या मालिकेतील एका एपिसोडमध्ये त्यांनी सोबत काम केले आणि त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला.

बिजयने आपल्या करियरची सुरूवात १९९४ आसमाँ या मालिकेद्वारे केली होती. जवळपास चार वर्षे मालिकेत काम केल्यानंतर बिजयने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९८ साली प्यार तो होना ही था या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

टॅग्स :सोनाली खरे