Join us

Sonali Kulkarni : पहिल्यांदा कावेरीची आई म्हणून..., सोनाली कुलकर्णीची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 2:06 PM

Sonali Kulkarn : सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. पण आता तिची लेक कावेरीचाही टीव्ही डेब्यू झालाये. कावेरीनं आयुष्यातलं पहिलंवहिलं शूटींग केलं. हा क्षण आई या नात्याने सोनालीने मनसोक्त जगला...

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarn) हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. घराघरात ती ओळखली जाते. कोणत्याही भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. पण आता तिची लेक कावेरीचाही पहिला वहिला टीव्ही डेब्यू झालाये. होय, सोनालीची लेक कावेरी ही नुकतीच ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमात दिसली. यानिमित्ताने कावेरीनं आयुष्यातलं पहिलंवहिलं शूटींग केलं. हा क्षण आई या नात्याने सोनालीने मनसोक्त जगला. मला पहिल्यांदा कावेरीची आई म्हणून कुठेतरी जायला मिळालं..., अशा शब्दांत तिनं तिचा आनंद व्यक्त केला. शिवाय यावरची एक भावुक पोस्टही शेअर केली.

वाचा, सोनालीची पोस्ट तिच्याच शब्दांत...Thank youuuuu !!!!!किती प्रेमानं तुम्ही सगळे प्रतिक्रिया देताय.. मला पण खरंच खूप आनंद झालाय.. कावेरी कितीदा तरी माझ्याबरोबर शूटला आली आहे पण अ‍ॅक्ट्रेस ची मुलगी तर अ‍ॅक्ट्रेसच.. ह्या गमतीजमतीच्या विधानांचाही मला राग येतो.. इतक्या लहान मुलांना कशाला काहीतरी बनवून टाकायचं आपण..? तर असो.. डॅा. प्रकाश बाबा आमटे सिनेमात माझी दिग्दर्शिका समृध्दी पोरे म्हणाली म्हणून मी एक वर्षाच्या चिमुकल्या कावेरीला मांडीवर घेऊन बसले होते - मोंताजच्या केवळ एका टॅाप शॅाटमधे.. वरून एक पिवळा ठिपका दिसतो.. तो म्हणजे प्रिया वहिनीनी दिलेला स्वेटर घालून बसलेलं माझं कावेरी बाळ 🥰मधे अनेक ठिकाणी आम्हाला बोलवलं गेलं पण काही कारणानी राहिलंच.. ती माझ्याबरोबर असते हेच मला महत्त्वाचं वाटतं..पण चला हवा येऊ द्या च्या टीमनी इतक्या प्रेमानी निमंत्रण दिलं.. Thank you केशव आणि वैष्णवी  आणि अर्थातच निलेश  किती छान संवाद साधतोस तू.. किती सहज.. कावेरीला स्केटस् घालायला परवानगी मिळाल्यामुळे ती खूषच झाली ! शिवाय ती तुम्हा सगळ्यांना प्रत्यक्ष पाहू शकली ह्याचा आनंद वेगळाच ... कावेरीचं शूटिंग हसतखेळत पार पडलं.. प्राचीताईनी जातीनी आमच्या कपड्यांची देखरेख केली.. विद्याताईनी नवी पिन आणली.. निखिलदादानी पहिला वहिला पफ मारला.. सुजीतनी आठवणीनी डबा दिला आणि श्रुतीताई खास कावेरीचे फोटो काढायला आली.. ह्या सगळ्या प्रेमामुळे मला खूप भरून आलंय.. मला पहिल्यांदा कावेरीची आई म्हणून कुठेतरी जायला मिळालं.. 

 

२०१० मध्ये सोनालीनं नचिकेत पंतवैद्यबरोबर दुसरा संसार थाटला. नचिकेत फॉक्स टीव्हीमध्ये एम.डी. पदावर कार्यरत आहेत.  सोनाली आणि नचिकेत यांना कावेरी नावाची एक मुलगी आहे.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीचला हवा येऊ द्याटेलिव्हिजनमराठी अभिनेता