तरुणाईच्या मनाचा ठाव घेतलेल्या ‘दिल चाहता है’ तुझे ढुंढता हूँ मै हर कहीं... या गाण्यात सैफअली खानसोबत ठुमके लावलेली सोनाली कुलकर्णी आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. हिंदीमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखविल्यानंतर सोनालीने अनेक दर्जेदार मराठी सिनेमे केले. सोनालीच्या डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाचे सर्वांनीच कौतुक केले. मधल्या काही चित्रपटांसाठी सोनालीने वजनही वाढविले होते. पण आता सोनाली खूपच स्लिम झाली असून ती वेगळ््या हेअरस्टाईलमध्येही पाहायला मिळत आहे. सोनालीने या मेकओव्हरविषयी ‘लोकमत सीएनएक्स’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाली, ‘‘मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात नेहमीच वेगळे राहायला आवडते. कपडे, मेक-अप, हेअरस्टाईल या गोष्टींवर मी सतत वेगवेगळे प्रयोग करीत असते. एकसारख्या लूकमध्ये प्रेक्षकांच्यासमोर येणे मला कंटाळवाणे वाटते. मेकओव्हरमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात खूपच फरक पडतो. मी आताच एक मस्त हेअरकट केला आहे. चित्रपटांमधील माझा लूक आणि वैयक्तिक आयुष्यातील मी वेगळी आहे. आजपर्यंत मी अनेक चित्रपट केले. माझ्या प्रत्येक चित्रपटातील भूमिकांचे प्रेक्षकांनी, मित्र-मैत्रिणींनी कौतुक केले. कॉम्प्लिमेंट्स मिळाल्याने आनंदही होतो. मला कोणी हॉट म्हटले तर मला आवडतेच. बदलत्या काळानुसार फॅशनेबल राहण्याचा मी प्रयत्न करते. सोनालीच्या या झक्कास हेअरकटला सोशल मीडियावर अनेक लाईक्स मिळत आहेत.
सोनालीला आवडतो हॉट लूक
By admin | Published: August 10, 2016 2:02 AM