Join us  

Sonali Phogat Death Case: शॉकिंग! सोनाली फोगाट यांच्या पीएने दिली गुन्ह्याची कबुली, मृत्यूआधीचा व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 6:21 PM

Sonali Phogat Death Case: संशयित आरोपींनी अभिनेत्रीला पाजलं होतं विष, पाहा VIDEO

Sonali Phogat Death Case:  ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री व भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सोनाली यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झालेला नसून त्यांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सोनाली फोगाट यांचा पीए सुधीर सांगवानने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा गोवा पोलिसांनी केला आहे.सोनाली फोगाट हत्येप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी पीए सुधीर सांगवान याला अटक केली होती. सोनाली फोगट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला नसून त्यांना जाणूनबुजून ड्रग्ज देण्यात आले होते, अशी कबुली दोन्ही संशयित आरोपींनी दिली असल्याची माहिती गोवा IGP पोलिसांनी दिली आहे. सोनाली यांना ड्रग्जचा ओव्हरडोस झाला होता. ANI नं याबाबत वृत्त दिलं आहे.

सोनाली फोगाट मृत्यूच्या आदल्या रात्री ज्या क्लबमध्ये पार्टी करत होत्या तिथलं सीसीटीव्ह फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून गोवा पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.  सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनाली फोगाट यांच्याबरोबर दोन्ही संशयित आरोपीपीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर  पार्टी करताना दिसत आहे. दोघे सोनाली यांना जबरदस्ती काही तरी पाजण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट दिवस आहे. दोघांनी सोनाली यांच्या ड्रिंक्समध्ये ड्रग्ज मिसळून त्यांना जबरदस्ती पाजलं. सोनाली यांना ड्रग्जचा ओव्हर डोस झाल्याचं गोवा पोलिसांनी म्हटलं आहे.

 सोनाली यांचं सीसीटीव्ही फुटेज आता सोनाली यांचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज गोव्याच्या त्याच हॉटेलमधील आहे, ज्या हॉटेलात सोनाली थांबल्या होत्या. या फुटेजमध्ये सोनाली यांना त्यांचा पीए हॉटेलबाहेर नेत असताना दिसत आहेत. सोनाली यांना कशाबशा चालत आहेत. त्यांना दोन व्यक्ती आधार देत आहेत. सोनाली यांना कथितरित्या हार्ट अटॅक आल्याचा दावा केला जात असतानाचा हा व्हिडीओ आहे. अर्थात आता सोनाली यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

 

सोनालीचा भाऊ रिंकू ढाका याने तिच्या मृत्यूसंदर्भात पोलिसांत तक्रार दिली होती. सोनालीचा मृत्यू हा किरकोळ नसून, ते कटकारस्थान आहे, अशी तक्रार दाखल केली होती.  सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी मिळून माज्या बहिणीला जाळ्यात अडकवलं.  सोनाली वषार्नुवर्षं सुरू असलेला बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि स्लो पॉयझनिंगची बळी ठरली आहे, असं तक्रारीमध्ये म्हटलं होतं.    

टॅग्स :सेलिब्रिटीभाजपाहरयाणागोवागुन्हेगारी