खुबसुरत या चित्रपटाने बॉक्स आॅफीसवर फारसा व्यवसाय केलेला नसला, तरी चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या सोनम कपूरच्या अभिनयाची मात्र भरभरून प्रशंसा होत आहे. त्यामुळे खुबसुरतची निर्माती कंपनी वॉल्ट डिज्नी आता त्यांच्या आगामी चित्रपटासाठी सोनमच्या नावाचा विचार करत असल्याचे समजते. द प्रिंसेस डायरी या हॉलीवूड चित्रपटाच्या रिमेकची ही योजना असून या चित्रपटात सोनम कपूर राजकुमारीच्या भूमिकेत दिसेल. द प्रिंसेस डायरीमध्ये अॅनी हॅथवेने केलेली भूमिका सोनमला साकारावी लागणार आहे. या चित्रपटाची योजना अद्याप प्राथमिक टप्प्यात असून येत्या काळात त्याबद्दल घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.