Join us

Cannes 2019: कान्स फेस्टिव्हलसाठी सोनम कपूरने अशाप्रकारे केले डाएट आणि वर्कआऊट, जाणून घ्या तिचा डाएट प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 8:00 AM

प्रसिद्ध न्यूट्रीशनिस्ट आणि फिटनेस ट्रेनर राधिका कार्लेसोबत सोनम गेल्या कित्येक महिन्यांपासून तिच्या फिगरवर काम करत आहे. 

ठळक मुद्देसोनमने सध्या चित्रीकरणातून ब्रेक घेतला असून कान्स फेस्टिव्हलला तिची फिगर चांगली दिसावी यासाठी ती प्रयत्न करत आहे. मी सध्या तिच्यासोबत सगळीकडे प्रवास करत असून तिथे गेल्यावर तिथे कोणते धान्य उपलब्ध होऊ शकते हे पाहाते आणि त्यानुसार तिचे डाएट आखते. 

सोनम कपूर कान्स फेस्टिव्हलला २० आणि २१ तारखेला हजेरी लावणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये आपली फिगर अतिशय सुंदर दिसावी यासाठी ती कित्येक महिने आधीपासून मेहनत करत आहे. गेल्या वर्षी कान्स फेस्टिव्हलला तिने हजेरी लावली असता तिचे वजन थोडेसे वाढले होते. यावरून मीडियात चांगलीच चर्चा झाली होती. गेल्या कान्सच्या काही महिन्याआधीच तिचे लग्न झाले होते. त्यामुळे तिचे वजन काहीसे वाढले आहे. पण या वर्षी काहीही केल्या आपण चांगल्या फिगरमध्येच दिसायचे असेच तिने ठरवले आहे. प्रसिद्ध न्यूट्रीशनिस्ट आणि फिटनेस ट्रेनर राधिका कार्लेसोबत ती गेल्या कित्येक महिन्यांपासून यावर काम करत आहे. 

राधिकाने वोगला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने सोनमच्या डाएट प्लानविषयी सांगितले आहे. ती सांगते, सोनमने सध्या चित्रीकरणातून ब्रेक घेतला असून कान्स फेस्टिव्हलला तिची फिगर चांगली दिसावी यासाठी ती प्रयत्न करत आहे. मी सध्या तिच्यासोबत सगळीकडे प्रवास करत असून तिथे गेल्यावर तिथे कोणते धान्य उपलब्ध होऊ शकते हे पाहाते आणि त्यानुसार तिचे डाएट आखते. 

तसेच सोनम जास्तीत जास्त पाणी, ज्यूस पिण्यावर भर देत आहे. याचा तिच्या स्किनवर नक्कीच परिणाम होईल असे माझे मत आहे. तसेच ती सध्या भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खात असून ती दिवसातून तीन वेळा तरी जेवते. ब्रेकफास्टला ती ग्ल्यूटिन फ्री टोस्ट खाते. तसेच त्यासोबत बेरी आणि कॉटेज चीत असते तर लंच आणि डिनरला ती घरात बनवेलेलेच जेवण जेवते असे राधिकाने मीड डे च्या मुलाखतीत सांगितले.

तर राधिकाने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, कान्समध्ये बॅकलेस आऊटफिट जास्त करून घातले जातात. तसेच कपडे शॉर्ट असतात. त्यामुळे आम्ही सध्या लेग वर्कवर लक्ष केंद्रित करत आहोत. त्यानंतर आम्ही अप्पर बॉडी वर्कआऊट करणार आहोत. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआऊट करतो. आम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला व्यायाम करतो.

टॅग्स :सोनम कपूरकान्स फिल्म फेस्टिवल