Join us

अभय देओलच्या '१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स' सीरिजमधील हे गाणे झाले रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 4:57 PM

'१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स' सीरिजमधील या गाण्यात देशभक्ती पहायला मिळते आहे.

'१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स' वेबसीरिजमधील ओरिजिनल साऊंड ट्रॅक 'हम शान से जलने निकले है' रिलीज झाले आहे. हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केलेले हा हृदयस्‍पर्शी म्‍युझिक व्हिडिओ जीवाची पर्वा न करता आपल्‍या देशाची सेवा करण्‍यासाठी पुढाकार घेतलेल्‍या एका सैनिकाच्‍या अनेक बलिदानांचे भावनिक कथन आहे. गायक विजय प्रकाश, सलमान अली आणि हितेश मोडक यांनी त्‍यांच्‍या मधुर आवाजासह कथेशी संबंधित अनेक भावना गाण्‍यांच्‍या माध्‍यमातून सादर केल्‍या आहेत. लवराज यांनी रचलेल्‍या गीतांमधून खरी देशभक्‍ती दिसून येते. सिरीजमध्‍ये असलेली इतर सहा गाणी भारतातील काही प्रतिभावान गायकांनी गायली आहेत जसे सुखविंदर सिंग, विजय प्रकाश, सलमान अली, शैलय बिडवायकर आणि शाहजन मुजीब.

सिरीजचे दिग्‍दर्शक महेश मांजरेकर म्‍हणाले, ''१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स ही शौर्य व पराक्रमाबाबतची प्रबळ कथा आहे. आमची कथेच्‍या अस्‍सल भावना सादर करणारे तितकेच प्रबळ साऊंडट्रॅक असण्‍याची इच्‍छा होती. हितेश व इतर सर्वांनी संगीतमय अविष्‍काराची निर्मिती करण्‍यामध्‍ये उत्तम कामगिरी बजावली आहे. 'हम शान से जलने निकले है'मध्‍ये लोकांना जागृत करण्‍याची आणि त्‍यांचे मन अभिमानाने भरण्‍याची शक्‍ती आहे.''

हितेश मोडक म्‍हणाले, ''१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स ही प्रेम, बलिदान व शौर्याची असाधारण कथा आहे. माझी विविध गाण्‍यांच्‍या माध्‍यमातून या भावनांची प्रखरता आणण्‍याची इच्‍छा होती. संपूर्ण अल्‍बममध्‍ये वैविध्‍यपूर्ण गाणी आहेत, प्रत्‍येक गाणे शोक, आनंद किंवा सन्‍मान अशा विविध भावनांना सादर करते. या प्रकल्‍पावर काम करण्‍याचा अनुभव सर्वोत्तम राहिला आहे. मी आशा करतो की, प्रेक्षक या गाण्‍यांमध्‍ये असलेल्‍या भावनांशी संलग्‍न होतील.'' 

महेश मांजरेकर दिग्‍दर्शित सिरीजमध्‍ये अभिनेता अभय देओल, माही गिल, आकाश ठोसर, सुमीर व्‍यास असे प्रतिभावान कलाकार आहेत. सिरीज '१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स' वास्‍तविक घटनांमधून प्रेरित आहे. ही सिरीज नोव्‍हेंबर १९६२ मधील युद्धाला सादर करते, जेव्‍हा १२५ भारतीय सैनिकांची तुकडी शौर्य व पराक्रमासह ३००० चीनी सैनिकांविरोधात लढले होते. ही वेबसीरिज डिस्ने+ हॉटस्‍टार प्रिमिअमच्‍या सबस्‍क्रायबर्ससाठी २६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :अभय देओलआकाश ठोसरमहेश मांजरेकर