बॉलिवूडचा प्रसिद्ध गायिका सोनू निगम (Sonu Nigam) आपल्या सामाजिक गोष्टींना घेऊन चर्चेत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो लोकांना बर्याच गोष्टींबद्दल जागरूक करताना दिसतो. अलीकडेच सोनू निगमने मुंबईत ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये रक्तदान केले. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. यासह त्याने व्हिडिओही शेअर केला आहे. मास्क न घातल्यामुळे यूजर्सनी सोनूला जोरदार ट्रोल केलं आहे.
सोनू निगमने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये जाऊन रक्तदान करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. लोकांनी यासाठी त्याचे कौतुक केले पण मास्क न घातल्यामुळे बरेच जणांना त्याला ट्रोल करतायेत.रक्तदान करताना सोनू निगमने त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढून टाकला होता.
व्हिडीओ शेअर करताना सोनू निगम म्हणाला की, येत्या काळात भारतात रक्ताची मोठी समस्या उद्भवणार आहे, म्हणूनच सावधगिरी बाळगा आणि लसी घेण्यापूर्वी रक्तदान करा. कोरोनावर मात दिल्यानंतर आणि वॅक्सिन घेण्यापूर्वी रक्तदान जरुर करा. सोनू निगमने एक दिवसापूर्वी व्हिडीओ शेअर करत त्याला कोरोना होऊन गेल्याचे सांगितलं. याबाबत त्याने कुणालाच काही सांगितलं नव्हते, सोनू निगमने वॅक्सिन घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला.