Join us

कोरोना काळात कुंभमेळा व्हायलाच नको होता...! सोनू निगमने शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 10:55 AM

Sonu Nigam on Kumbh Mela 2021: गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी कुंभमेळ्यातील गर्दीवर संताप व्यक्त केला. आता सोनू निगमने एक व्हिडीओ शेअर केला आहे

ठळक मुद्देसोनू सध्या गोव्यात आहे आणि आज मुंबईत परतत आहेत. मुंबईत येताच सावधगिरी म्हणून तो स्वत:ला आयसोलेट करणार आहे. 

भारतात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट आली आहे. पुन्हा एकदा कोरोना रूग्ण आणि मृतांचे आकडे सुन्न करणारे आहेत. अनेक राज्यांत कोरोनाची स्थिती बिकट आहे. काही राज्यांत कडक निर्बंध सुरु आहेत. मात्र याऊपरही कोरोना संक्रमितांची संख्या वाढताना दिसतेय. अशात देशाच्या काही कोप-यात कोरोना नियमांची पायमल्ली करत अनेक इव्हेंट सुरु आहेत. हरिद्वारमधील कुंभमेळयातही (Kumbh Mela) सर्व नियम पायदळी तुडवत गर्दी पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी कुंभमेळ्यातील या गर्दीवर संताप व्यक्त केला. आता या पार्श्वभूमीवर गायक सोनू  निगमने (Sonu Nigam) एक व्हिडीओ शेअर केला आहे. कोरोनाची लाट असताना कुंभमेळ्याचे आयोजन करायलाच नको होते, अशी भूमिका या व्हिडीओत त्याने मांडली आहे. मोठ्या बहिणीच्या पतीला कोरोना झाला असून सध्या ते दिल्लीच्या रूग्णालयात आयसीयूमध्ये भरती असल्याचेही त्याने या व्हिडीओत सांगितले आहे. (Sonu Nigam on Kumbh Mela 2021)

सोनू म्हणतो,मी दुस-या कुठल्या गोष्टीबद्दल बोलणार नाही. पण  मी हिंदू कुटुंबात जन्मलोय. हिंदू या नात्याने म्हणू शकतो की, कुंभमेळा व्हायलाच नको होता. देवाची कृपा की, आत्ता केवळ सांकेतिक झाला आहे. हा श्रद्धेचा मुद्दा आहे, मान्य आहे. पण संपूर्ण जगात सध्या जी काही स्थिती आहे, ती बघता लोकांचा जीव अधिक महत्त्वाचा आहे. अशाकाळात  शो सुद्धा व्हायला नकोत. कुठलाही शो सोशल डिस्टंसिंगचे पालन करून व्हायला हवा. पण तूर्तास नाहीच, असे सोनूने त्याच्या व्हिडीओत म्हटले आहे.

सोनू सध्या गोव्यात आहे आणि आज मुंबईत परतत आहेत. मुंबईत येताच सावधगिरी म्हणून तो स्वत:ला आयसोलेट करणार आहे. सोनूला त्याच्या वडिलांना भेटायचे आहे. पण त्यापूर्वी काही दिवस तो स्वत:ला आयसोलेट करणार आहे़. सगळे काही ठिक आहे, याची खात्री झाल्यानंतरच तो वडिलांना भेटणार आहे.

टॅग्स :सोनू निगम