बॉलिवूड सिंगर सोनू निगम सध्या रूग्णालयात उपचार घेतोय. होय, सी फूड खाण्याचे निमित्त झाले आणि सोनूला गंभीर अॅलर्जी झाली. यामुळे त्याचा एक डोळा सुजला. यानंतर लगेच त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आले.सोनूने स्वत: इन्स्टाग्रामवर आपले दोन फोटो शेअर करत, याची माहिती दिली आहे. सी फूड खाल्ल्यामुळे माझ्यावर ही वेळ आली. रूग्णालयात पोहोचायला आणखी उशीर झाला असता तर गंभीर स्थिती ओढवली असती. माझ्या श्वसननलिकेला सूज आली असती आणि मी श्वास घेऊ शकलो नसतो, असे सोनूने म्हटले आहे. अॅलर्जीकडे कधीही दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही त्याने दिला आहे.
सोनू निगमला सी फूड खाणे भोवले, रूग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 12:39 PM
बॉलिवूड सिंगर सोनू निगम सध्या रूग्णालयात उपचार घेतोय. होय, सी फूड खाण्याचे निमित्त झाले आणि सोनूला गंभीर अॅलर्जी झाली. यामुळे त्याचा एक डोळा सुजला. यानंतर लगेच त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आले.
ठळक मुद्देअॅलर्जीकडे कधीही दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही त्याने दिला आहे.