बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) दिलदारपणाबाबत सर्वांनाच माहीत आहे. सोनूने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून गरजू लोकांची मदत केली आहे. अजूनही त्याचं लोकांच्या मदतीचं काम सुरूच आहे. अजूनही कोरोना महामारी पूर्णपणे गेलेली नाही. साऊथमधील काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचा कहर सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच कमल हसन हे कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. आता एका कोरिओग्राफर कोरोनाचे लागण झाले असून त्यांची मदत सोनू सूदने केली आहे.
कोरोनाचे लागण झालेले ७२ वर्षीय कोरिओग्राफर शिवशंकर यांची स्थिती नाजूक आहे. त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. साऊथ इंडस्ट्रीतील पीआर कन्सलटंट वामसी काका यांच्याकडून एक लेख लिहिण्यात आला, ज्यात सोनू सूदला टॅग करण्यात आलं होतं. त्यात शिवशंकरची स्थिती नाजूक असल्याचं सांगण्यात आलं होतं. सोनूला हे समजताच त्याने मदतीचा हात पुढे केला.
२५ नोव्हेंबरला सोनू सूदने ट्विटला रिप्लाय दिला आहे आणि लिहिलं की, मी आधीच त्यांच्या परिवाराच्या संपर्कात आहे. मी त्यांचा जीव वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. सोनू सूदने त्याच्या करिअरच्या सुरूवातील साऊथ सिनेमातच काम केलं होतं. आज तो साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठं नाव झाला आहे.
शिवशंकर यांच्याबाबत सांगायचं तर साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्यांना त्यांच्या कामासाठी ओळखलं जातं. मगधीरासारख्या सिनेमातील कोरिओग्राफीसाठी त्यांना नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी काही सिनेमांमध्ये अभिनयही केला आहे.