कोरोना महामारीच्या काळात बॉलिवूडचा एक हिरो अनेकांची प्रेरणा बनला. अनेकांना मदतीचे हात देणा-या या रिअल हिरोचे नाव काय तर सोनू सूद. हजारो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचवण्यापासून तर बेरोजगारांना रोजगार देण्यापर्यंत आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवण्यापासून तर रूग्णांच्या सर्जरीचा खर्च उचलण्यापर्यंत सोनू सूदने प्रत्येक गरजूची मदत केली. आजही त्याच्या मदतीचा ओघ सुरुच आहे. अशा या दानशूर हिरोला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा कोणाला होणार नाही. सोनूच्या चाहत्याने अशीच एक इच्छा व्यक्त केली. या चाहत्याला सोनूने असे काही उत्तर दिले की, चाहते पुन्हा एकदा या हिरोच्या प्रेमात पडले.
‘सोनूजी मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. तुम्हाला भेटण्याची माझी इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही का? कदाचित माझी ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. तरीही फक्त एकदाच ‘आपण भेटू’, असे म्हणा,’ असे ट्विट नीरज कुमार नामक एका चाहत्याने केले. दिलदार सोनूने यावर भन्नाट रिप्लाय दिला. ‘आपण नक्की भेटू पण तू जे लिंबू पाणी पित आहेस ते तुला माझ्यासाठी घेऊन यावे लागेल,’ असे सोनूने यावर लिहिले. लॉकडाऊनच्या काळात घरी परतणा-या श्रमिकांच्या पाठीशी सोनू ठामपणे उभा राहिला होता. त्यानेअशा हजारो श्रमिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी बसेसची व्यवस्था केली होती. या व्यवस्थेमुळे हजारो श्रमिकांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचता आले.गोरगरीबांसाठी हिरो ठरलेल्या सोनूचे नाव गेल्या काही दिवसांत गुगलवर सर्वाधिक सर्व करण्यात आले आहे. त्यामुळे त्याने गुगल ट्रेडिंगच्या यादीत अव्वल स्थान पटकावले होते. देशातील कानाकोपऱ्यातून त्याच्याविषयी सर्च करण्यात आले.
मुंबईत दोन तास वीज नव्हती तर...! सोनू सूदने केली ‘लाखमोला’ची बात
‘बत्ती गुल’वरचे ट्विट झाले होते व्हायरलअलीकडे मुंबईत वीजपुरवठा खंडित झाला होता. दोन तास मुंबईत वीज नव्हती ही बातमी काहीच मिनिटात अख्ख्या जगाला कळली होती. अभिनेता सोनू सूद यानेही मुंबईच्या ‘बत्ती गुल’वर प्रतिक्रिया दिली होती.‘मुंबईत दोन तास वीजपुरवठा खंडीत झाल्यावर अख्ख्या देशाला कळले. पण आजही देशात अशी अनेक घरे आहेत, ज्यांना दोन तासही वीज मिळत नाही. त्यामुळे कृपया संयम बाळगा...,’असे ट्विट सोनू सूदने केले होते.
गोरगरीबांसाठी हिरो ठरलेला सोनू सूद जगतो असे आयुष्य,पहिल्यांदाच बघा आलिशान घराचे Inside Photosत्याचे हे ट्विट मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्याची बातमी व्हायरल झाली, त्याचे वेगाने व्हायरल झाले होते.