Join us

मानलं भावा! सोनू सूदनं हॉस्पिटलला प्रमोट करण्याच्या बदल्यात मागितली एकच गोष्ट, तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 11:22 AM

Sonu Sood : कोरोना आटोक्यात आला, पण सोनूच्या मदतीचा ओघ आटला नाही. आजही रोज शेकडो लोक सोनूकडे मदत मागतात आणि सोनू त्यांना शक्य ती सर्व मदत करतो. आता गरजूंच्या मदतीसाठी सोनूनं एक नवा पर्याय शोधला आहे.

कोरोना महामारीच्या काळात अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) दिवसरात्र खपला. स्थलांतरित मजूरांना त्यानं केलेली मदत अख्ख्या जगानं पाहिली. कोरोना आटोक्यात आला, पण सोनूच्या मदतीचा ओघ आटला नाही. आजही रोज शेकडो लोक सोनूकडे मदत मागतात आणि सोनू त्यांना शक्य ती सर्व मदत करतो. आता गरजूंच्या मदतीसाठी सोनूनं एक नवा पर्याय शोधला आहे. त्याबद्दल कळल्यावर तुम्हीही सोनूचं कौतुक कराल. होय, एका रूग्णालयाला प्रमोट करण्याच्या बदल्यात सोनूनं काय मागावं, तर 50 लिव्हर ट्रान्सप्लांट. होय, खुद्द सोनूनं हा खुलासा केला आहे.

‘द मॅन’ या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सोनू यावर बोलला. अलीकडे मी जाहिरात व एंडोर्समेंट्समधून जो काही पैसा कमावला तो सगळा चॅरिटीला दिला, असं सोनूनं सांगितलं. शिवाय हॉस्पिटल प्रमोट करण्याच्या बदल्यात लिव्हर ट्रान्सप्लान्ट घेतल्याच्या घटनेचाहा उल्लेख केला.तो म्हणाला,‘एका हॉस्पिटलने माझ्यासोबत मिळून आरोग्यक्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी त्यांना म्हणालो, मी तुमच्या हॉस्पिटलला प्रमोट करेल. पण त्या बदल्यात मला 50 लिव्हर ट्रान्सप्लान्ट द्यावे लागतील. त्याचा खर्च 12 कोटी रूपये होता. आत्तापर्यंत अशा दोन लोकांचे लिव्हर ट्रान्सप्लाट सुरू आहेत. जे आयुष्यात कधीच इतका मोठा खर्च उचलू शकले नसते. हीच जादू आहे. लोक तुमच्याकडे येतात आणि आम्ही तुमची कशी मदत करू, असं विचारतात.  यातून आम्हाला लोकांच्या मदतीसाठी नवंनवे मार्ग मिळत जातात.’

सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच ‘पृथ्वीराज’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. तर अक्षय कुमार चित्रपटात पृथ्वीराजची भूमिका वठवतोय. शिवाय संजय दत्त देखील चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या 3 जून रोजी हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सोनू सूदबॉलिवूड