कोरोना काळात गरजूंना भरभरून मदत करणारा आणि लोकांसाठी ‘देवदूत’ ठरलेला अभिनेता सोनू सूद बॉलिवूडमधील ऐक्यावर उघडपणे बोलला. बॉलिवूडमध्येऐक्याच्या, युनिटीच्या गप्पा मारल्या जातात. पण प्रत्यक्षात असे काहीही नाही. इंडस्ट्रीतलेच काही लोक इंडस्ट्रीवर प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा दु:ख होते. हे बोलताना सोनूने कोणाचेही नाव घेतले नाही. पण त्याच्या बोलण्याचा रोख कंगना राणौतकडे होता.
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूद पहिल्यांदाच बॉलिवूडवर इतका मनमोकळेपणाने बोलला. बॉलिवूडमध्ये अनेक लोकांनी स्वत:च्या अवतीभवती कुंपण घालून घेतले आहे. इथे केवळ यशस्वी लोकांची किंमत केली जाते. तुम्ही फेल झालात की, तुम्हाला कोणीही मदत करत नाही. मी यामुळे व्यथित होतो. पण इंडस्ट्रीतलेच लोक इंडस्ट्रीवर प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा मी त्याहीपेक्षा व्यथित होतो. हीच इंडस्ट्रीत जिच्यासाठी आपण आपले घर सोडून आलोत, जिने आपली स्वप्नं पूर्ण केलीत. काही लोक कृतघ्नपणे याच इंडस्ट्रीबद्दल बोलतात. यामुळे इंडस्ट्रीचे किती नुकसान होत असेल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकतात.
इंडस्ट्रीतल्या लोकांना एका कुटुंबाप्रमाणे नांदायला हवे. सर्वांना सोबत घेऊन चालायला हवे. पण आता ती साखळीच तुटलेली दिसतेय. अशात प्रत्येक जण निराश आहे, व्यथित आहे, असे सोनू सूद म्हणाला.सोनू सूदचा इशारा कंगनाकडे होता, हे लपून राहिलेले नाही. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार असल्याचे कंगना म्हणाली होती. इंडस्ट्रीतील 99 टक्के लोक ड्रग्ज घेतात, असा आरोपही तिने केला होता. तिच्या या विधानाची जया बच्चन, रवीना टंडन, हंसल मेहतासह अनेक सेलिब्रिटींनी निंदा केली होती.
VIDEO: फॅनच्या फूड स्टॉलला सोनू सूदने दिली सरप्राइज भेट, फ्राइड राइस बनवला अन् खाल्लाही...