Join us

दिलदार स्टार! सोनू सूदने एकाला घेऊन दिली म्हैस, त्यानंतर जे लिहिलं ते वाचून तुम्हीही व्हाल भावूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 12:35 PM

सोनू सतत देश-विदेशातील गरजू लोकांची मदत करत आहे. अनेकांना रोजगारही मिळवून देत आहे. नुकतीच त्याने बिहारमधील एका व्यक्तीला म्हैस खरेदी करून दिली. ज्याची माहिती त्याने ट्विटरवर दिली आहे.

लॉकडाऊनमध्ये लोकांची मदत करून रिअल लाइफमध्ये सुपरहिरो ठरलेला अभिनेता सोनू सूदला एक नवीन दृष्टीकोन मिळाला आहे. आता तो पूर्णपणे याच कामात बिझी आहे. सोनू सतत देश-विदेशातील गरजू लोकांची मदत करत आहे. अनेकांना रोजगारही मिळवून देत आहे. नुकतीच त्याने बिहारमधील एका व्यक्तीला म्हैस खरेदी करून दिली. ज्याची माहिती त्याने ट्विटरवर दिली आहे.  

एका ट्विटर यूजरने लिहिले होते की, चंपारणमधील भोलाचा मुलगा आणि म्हैस पूरात वाहून गेले. म्हैस ही एकुलती एक त्याच्या उत्पन्नाचं साधन होती. त्याच्या नुकसानही भरपाई करण्याचा प्रयत्न सोनू सूदने केला. सोनू सूद आणि नीती गोयलने भोला नावाच्या व्यक्तीला म्हैस घेऊन दिली. जेणेकरून यातून तो दोन पैसे कमावू शकेल आणि आपलं घर चालवू शकेल.

यावर सोनू सूदने ट्विट करत लिहिले की, 'मी इतका एक्सायडेट माझी पहिली कार खरेदी करतानाही नव्हतो, जेवढा एक्सायटेड मी तुझ्यासाठी म्हैस खरेदी करताना झालोय. जेव्हा बिहारमध्ये येणार तेव्हा एक ग्लास म्हशीचं ताजं दूध नक्की पिणार'.

सोनू सूदच्या या अंदाजाची त्याच्या फॅन्सने सोशल मीडियावर भरभरून कौतुक केलंय. दरम्यान सोनू सूदने त्याला दररोज मदतीसाठी किती मेसेज येतात याची आकडेवारी शेअर केली आहे. जी पाहून लोक थक्क झालेत. तसेच सोनू सूदने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तो लॉकडाऊनमध्ये मजूरांच्या स्थितीवर एक पुस्तक लिहित आहे. जे लवकरच येईल. सोनू म्हणाला की, येणाऱ्या काळात लोकांना हे पुस्तक नक्कीच वाचायला आवडेल.

हे पण वाचा :

बाबो! सोनू सूदकडे एका दिवशी किती लोक मागतात मदत? पहिल्यांदाच शेअर केली आकडेवारी!

राजस्थानला जाण्यासाठी एकाने मागितली कार, सोनू सूदचं उत्तर वाचून हसून लोटपोट झाले लोक!

पुराच्या पाण्यात घर गेले अन् पुस्तकही; ढसाढसा रडणाऱ्या मुलीला सोनू सूद म्हणाला, ताई अश्रू पूस! आता...

टॅग्स :सोनू सूदबॉलिवूडसोशल मीडिया