मजुरांसाठी देवदूत बनलेल्या सोनू सूदने लॉकडाऊन काळाच केलेले मदतकार्य पाहून सर्व स्थरावरून त्याचे कौतुक झाले. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले त्याचे हे मदतकार्य आजतायगायत सुरू आहे. केवळ स्थलांतरीतांना घरी पोहचवणेच नाही तर विविध गोष्टींसाठी सोनू सूद पुढे आला होता. आता पुन्हा एकदा सोनू सूदने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मोठे कार्य करणार असल्याची घोषणा केली आहे.
एक बेघर महिला आपल्या दोन मुलांना घेऊन फुटपाथवर झोपलेली असतानाचा फोटो युजरने ट्वीटरवर शेअर करत त्यात त्याने सोनूकडून मदत मागितली होती. सोनुने देखील विलंब न करता तातडीने त्या ट्वीटला रिप्लाय दिला. उद्या रात्रीपर्यंत या मुलांच्या डोक्यावर छत असेल असा रिप्लाय सोनुने दिला. सोनूचा रिप्लाय पाहून अनेकांचा ऊर अभिमानाने भरून आला आणि रिअल हिरो कसा असतो याची प्रचिती पुन्हा सा-यांना आली. त्या महिलेचे कुटुंब पटनामध्ये राहत होते. पतीचा मृत्यू झाल्यानंतर घरमालकाने या महिलेला तिच्या मुलांसह घराबाहेर काढले. त्यानंतर आपल्या भुकेलेल्या मुलांना घेऊन ती फुटपाथवर राहू लागली. अशी माहिती फोटोसोबत एका युजरने दिली होती.
रुपेरी पडद्यावर खलनायक साकारणारा सोनू ख-या आयुष्यात मात्र लोकांचा हीरो झाला आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. आज जगण्यासाठी संघर्ष करणा-या मजुरांना मदतीचा हात देणा-या सोनू सूदनेही एक काळ संघर्षात घालवला आहे. त्यामुळे जगण्यासाठी संघर्ष काय असतो हे सोनूूने अनुभवले आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात देवदूताच्या रूपात मजूरांसाठी धावून आला होता. यापैकीच एका मजुराने सोनूचे आभार मानले आहेत. त्याचे नाव प्रशांत कुमार. ओडिसाच्या केंद्रपाडा येथे राहणा-या प्रशांत कुमारने आता एक वेल्डिंग वर्कशॉप उभारले आहे आणि या वर्कशॉपला त्याने सोनू सूदचे नाव दिले आहे.