अभिनेता सोनू सूद कोरोना काळात अनेक गरजू लोकांसाठी देवदूत ठरला आहे. त्याने इतक्या लोकांची मदत केली आहे की, तो आता लोकांच्या लाइफमध्ये रिअल हिरो ठरला आहे. अनेकांना आपल्या दुकानांनाच नाही तर आपल्या मुलांची नावेही त्याच्या नावावर ठेवली आहेत. हैद्राबादमधील अशाच एक फॅनच्या फूड स्टॉलवर पोहोचून सोनू सरप्राइज दिलं. ख्रिसमसला तो फॅनच्या फूड स्टॉलवर गेला, त्याने कुकिंग केली आणि फ्राइड राइस-मंच्युरिअनही खाल्ल.
कोण म्हणतं ख्रिसमसला आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत? शुक्रवारी एका फूड स्टॉलच्या मालकाला फार मोठं गिफ्ट मिळालं. सोनू सूदला हैद्राबादमध्ये त्याच्या फॅनच्या फूड ट्रकवर पोहोचला आणि त्याला ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. या दुकानाच्या मालकाने आपल्या स्टॉलचं नाव सोनू सूदच्या नावावर ठेवलं.
सोनूला बघून फॅन अनिल त्याच्या पायांवर पडला. बेगमपेट स्थित या शॉपचं नाव मालकाने 'लक्ष्मी सोनू सूद फास्ट फूड सेंटर' असं ठेवलं. सोनू नुसता या फॅनच्या स्टॉलवरच गेला नाही तर तेथील फूडही टेस्ट केलं आणि कुकिंगमध्येही हात आजमावला.
दरम्यान, सोनू सूदने लॉकडाऊन दरम्यान हजारो लोकांची मदत केली होती. इतकेच नाही तर अजूनही तो अनेकांना मदत करत आहे. त्याच्या सोशल मीडिया हॅंडलवरून लोक त्याच्याकडे वेगवेगळ्या मागणी करतात. सोनूने कोरोना काळात बेरोजगार झालेल्या अनेकांना नोकरीही दिली आहे. अनेकांना आर्थिक मदतही केली आहे. यासाठी त्याने एक अॅपही लॉन्च केलंय. अनेकांना उपचारासाठी, शिक्षणासाठी, बिझनेससाठीही मदत केली आहे.