अभिनेता सोनू सूदने गेल्या काही महिन्यांपासून हजारो प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. लॉडडाऊन दरम्यान मुंबईतून दुसऱ्या राज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं हे काम अजूनही थांबलेलं नाही. आता सोनू प्रवाशी मजूरांना त्यांच्या गावात रोजगारही मिळवून देणार आहे. त्यासाठी तो एक अॅप घेऊन आला. याचं नाव 'प्रवासी रोजगार' आहे. याने मजूरांना रोजगार शोधण्यास मदत मिळेल.
सोनू सूद हा कोरोना महामारीत लोकांसाठी मसीहा बनूनच समोर आला आहे. लोकांना घरी पोहोचवण्यासोबतच त्यांच्या डोक्यावर छत दिल्यानंतर आता तो गरजू लोकांच्या रोजगाराची व्यवस्था करत आहे. सोनूने सांगितले की, 'आपल्या गावी परतल्यावर लोक आता रोजगार शोधत आहेत. सध्या काम मिळणं फार कठिण आहे. भलेही केंद्र सरकारची योजना आहे. पण लोकांना सध्या लॉंग टर्म सॉल्यूशनची गरज आहे. या मजूरांना शहरांमध्ये, गावांमध्ये कामाशी जोडणं गरजेचं आहे. तसेच त्यांच्या गावातही त्यांच्यासाठी काम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन'.
या जबरदस्त कामासाठी सोनूने त्याच्या इंजिनिअर मित्रांची मदत घेतली आहे. अनेक कंपन्या आणि एनजीओ त्याला फार सपोर्ट करत आहेत. हे अॅप सध्या इंग्रजीत आहेत. पण लवकरच ५ इतर भाषांमध्ये उपलब्ध होईल. याने मजूरांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जाण्यासही मदत मिळेल.
सोनूने सांगितले की, आमची एक वेबसाइट आणि अॅप आहे. ग्राउंडवर लोक आहेत जे मजूरांना रजिस्ट्रेशनसाठी मदत करतील. आमचा हेल्पलाइन नंबर आहे. लोक त्यावर फोन करून स्वत:ला रजिस्टर करू शकतात. आम्हाला तुमच्या योग्यता सांगा आणि काय शिकायचं आहे तेही सांगा. आम्ही त्यांचं प्रोफाइल तयार करू, त्यांना ट्रेनिंग देऊ आणि कामही देऊ.
त्याने पुढे सांगितले की, सध्या लोकांना हे माहीत नाही की काम कुठे गेला. जे लोक मजूरांच्या शोधात आहेत, त्यांना मजूर कुठे मिळतील हे माहीत नाही. लोकांना काम मिळवून देण्याच्या या प्रयत्नात लोकांना एक रूपयाची चार्ज केला जाणार नाही.