सोनू सूदचा जबरा फॅन! लाडक्या कलाकाराच्या प्रेमापायी थेट १५०० किमी धावत चाहत्यानं गाठली मुंबई!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 08:29 AM2024-05-01T08:29:36+5:302024-05-01T08:30:36+5:30

बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद.

Sonu Soods Fan Runs 1500 Kms From Delhi To Mumbai To Meet The Real-Life Hero | सोनू सूदचा जबरा फॅन! लाडक्या कलाकाराच्या प्रेमापायी थेट १५०० किमी धावत चाहत्यानं गाठली मुंबई!

सोनू सूदचा जबरा फॅन! लाडक्या कलाकाराच्या प्रेमापायी थेट १५०० किमी धावत चाहत्यानं गाठली मुंबई!

बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद. उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारा सोनू सूद गेल्या काही वर्षांपासून त्याच्या जनसेवेसाठी ओळखला जात आहे.  सोनू सूद याने लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात अनेकांची मदत केली होती. त्याच्या या मदतीमुळे अनेक जण आज ही त्याच्या घराबाहेर मदतीसाठी, आभार व्यक्त करण्यासाठी जमा होत असतात. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. असाच एक चाहता आपल्या लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी थेट १५०० किमी धावत मुंबईत पोहोचला. 

सोनू सूदच्या या चाहत्याचे नाव हे महेश असं आहे. तो दिल्लीहून धावत मुंबईमध्ये आला आहे. सध्या सोशल मीडियावर सोनू सूदचा आणि त्याच्या चाहत्याचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये चाहता पांढऱ्या टी- शर्टमध्ये दिसून येत आहे.  "इंडिया गेट (दिल्ली) ते गेटवे ऑफ इंडिया (मुंबई) रन - 1500 किमी..." असं त्याच्या टी- शर्टवर लिहिलेलं आहे. हा सर्व प्रकार पाहून सोनू सुद देखील थक्क झाला.

सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'फतेह' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनंदन गुप्ता यांनी केले आहे. ज्यांनी यापूर्वी 'बाजीराव मस्तानी' आणि 'शमशेरा' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. चित्रपटात ॲक्शनचा धमाका पाहायला मिळणार आहे. 
 

Web Title: Sonu Soods Fan Runs 1500 Kms From Delhi To Mumbai To Meet The Real-Life Hero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.