Join us

VIDEO : छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं! प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवी मालिका सज्ज, पाहा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:10 IST

Chotya Bayochi Motthi Swapna : नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला. ‘इवल्या डोळ्यांना मोठ्या स्वप्नांची ओढ, बयोच्या ध्यासाला पुस्तकांची जोड’, अशा आशयाच्या कॅप्शनसह हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

सध्या मराठी मालिकांना जणू सुगीचे दिवस आले आहेत. अनेक मराठी वाहिन्यांवरील मराठी मालिकांना प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळतोय. टीआरपीच्या शर्यतीत अनेक मराठी मालिकांनी बाजी मारली आहे. साहजिकच अनेक वाहिन्यांवर नवनव्या विषयांवरच्या नवनव्या मालिका पाहायला मिळत आहेत. आता आणखी एक नवीकोरी मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. होय, सोनी मराठी  (Sony Marathi )  वाहिनीवर ही नवी मालिका सुरू होतेय.

नुकतीच सोनी मराठीवर ‘जिवाची होतीया काहिली’ ही लव्हस्टोरी सुरू झाली. या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. ‘जिवाची होतीया काहिली’नंतर सोनी मराठी ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ (Chotya Bayochi Motthi Swapna ) ही नवी मालिका घेऊन येतेय. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला.  ‘इवल्या डोळ्यांना मोठ्या स्वप्नांची ओढ, बयोच्या ध्यासाला पुस्तकांची जोड’, अशा आशयाच्या कॅप्शनसह हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

प्रोमो आणि कॅप्शन बघून या मालिकेच्या कथेची कल्पना तुम्हाला आलीच असेल. छोटी बयो पुस्तकवेडी आहे. सगळे तिच्या वाचनवेडाला वैतागलेत, पण तितकंच तिचं कौतुकही आहे.  दिवसरात्र पुस्तकांत गुंतलेली ही बयो तिची स्वप्नं पूर्ण करू शकेल का?  हे तर मालिका पाहिल्यानंतरच कळेल.ही मालिका कधीपासून सुरू होणार, या नव्या मालिकेमुळे कोणती जुनी मालिका निरोप घेणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना आवडला आहे आणि बयोची कथा पाहायला प्रेक्षक उत्सूक आहेत.

वीणा जामकर साकारणार बयोची आई

‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ या मालिकेत अभिनेत्री वीणा जामकर  बयोच्या आईच्या भूमिकेत आहे. वीणा जामकरने वळू, गाभ्रीचा पाऊस, मर्मबंध यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ‘भाई व्यक्ती की वल्ली?’ या चित्रपटात ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. वीणा जामकरने आजवर अनेक प्रकारच्या भूमिका साकरल्या आहेत.  ‘रमाई’ या चित्रपटात रमाबाई यांच्या भूमिकेत झळकली होती.

टॅग्स :सोनी मराठीटेलिव्हिजनवीणा जामकर