दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री जिया खान (jiah khan) आत्महत्या प्रकरणातून अभिनेता सूरज पांचोली (sooraj pancholi) याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्याअभावी त्याची सुटका करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाकडून हा निर्णय देण्यात आला आहे. सूरजची तब्बल १० वर्षानंतर सुटका झाल्यावर त्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
निर्दोष सुटका झाल्यानंतर सूरज पांचोलीने त्याची पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. या १० वर्षात माझी झोप उडाली होती, असं त्याने म्हटलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याच्या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा रंगली आहे.
"आज मी फक्त एख केस जिंकली नाहीये. तर, माझी गमावलेली प्रतिष्ठाही पुन्हा परत मिळवली आहे. अशा आरोपांना सामोरं जाणं खरंच माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझी गेलेली १० वर्ष मला कोण परत करेल?", असं म्हणत त्याने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, २८ एप्रिल रोजी जिया खान प्रकरणातून सूरजची सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जियाला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. जियाने ३ जून २०१३ रोजी मुंबईतील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने सूरजवर अनेक गंभीर आरोप केले होते.