अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर 'सूर्यवंशी'चा बॉक्स ऑफिसवर (Sooryavanshi Box Office Collection) धमाका सुरूच आहे. ब्लॉकबस्टर वीकेंडनंतर सिनेमाने चौथ्या दिवशी चांगला बिझनेस केला. पहिल्याच वीकेंडला ७७.०८ कोटी रूपयांची कमाई केली होती. 'सूर्यवंशी'ने ओपनिंग डे शुक्रवारी २६.२९ कोटी रूपये, शनिवारी २३.८५ कोटी रूपये आणि रविवारी २६.९४ कोटी रूपये कमाई केली. आतापर्यंत या सिनेमाने पहिल्या वीकेंडला एकूण ७७.०८ कोटी रूपयांचं कलेक्शन केलं आहे.
‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) ने चौथ्या दिवशी १४-१५ कोटी रूपयांचां बिझनेस केला. म्हणजे सिनेमाने आतापर्यंत ९२ कोटी रूपयांचा बिझनेस केला आहे. ट्रेड एनालिस्ट्सचं मत आहे की, सिनेमा आज १०० कोटी क्लब मध्ये सहभागी होणार. सिनेमाच्या निर्मात्यांनी सोमवारी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं होतं की, सूर्यवंशीचं वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन १०१ कोटी रूपयांपर्यंत पोहोचलं आहे. हा सिनेमा १५ देशांमध्ये रिलीज झाला आहे.
सूर्यवंशीचं दिग्दर्शन रोहित शेट्टीने केलं आहे. भारतात हा सिनेमा तब्बल ३०० स्क्रीनवर रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, सिनेमा एका आठवड्यात १२० कोटी रूपयांची कमाई करू शकतो. सूर्यवंशीसोबतच रजनीकांतचा ‘अन्नात्थे’ सिनेमाही चांगली कमाई करत आहे. हे सिनेमे कोरोना महामारीनंतर रिलीज झाले आहेत. त्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.