Join us

प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री लग्नबंधनात अडकली, शाही विवाहसोहळ्याला जॅकी श्रॉफचीही हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 18:18 IST

सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री कार्तिका नायर (Karthika Nair) आज लग्नबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड रोहित मेननसह तिने वयाच्या ३१ व्या वर्षी लग्नगाठ बांधली. केरळच्या त्रिवेंद्रममध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात मेगास्टार चिरंजीवी, जॅकी श्रॉफ, राधिका सरथकुमार, रेवती, मेनका, व्यंकटेश दुगुबत्तीसह अनेक कलाकार सामील झाले होते. सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

कार्तिका नायरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. नवविवाहित जोडप्याचा खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये रोहित कार्तिकाच्या कपाळावर किस करताना दिसतोय. कार्तिका लाल रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तर रोहितने क्रीम रंगाची शेरवानी घातली आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले, 'तुमचं प्रेम आणि आशिर्वाद घेत आम्ही नवीन जीवनाला सुरुवात करत आहोत.' 

कार्तिकाच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच तिच्या लग्नाचे इतरही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये अपना भिडू जॅकी दादाचाही फोटो दिसत आहे. 

कार्तिकाने २००९ साली आलेल्या 'जोश' या तेलुगू सिनेमातून डेब्यू केले होते. यामध्ये ती नागा चैतन्यसोबत दिसली. याशिवाय तिने 'को','ढमू' या काही सिनेमांमध्येही काम केले आहे.

टॅग्स :लग्नजॅकी श्रॉफकेरळबॉलिवूड