Join us

प्रेग्नेंसीमध्ये अभिनेत्रीच्या पतीचं निधन; म्हणते, "लोकांचे टोमणे ऐकून हसणंच विसरून गेली होती"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 11:06 AM

7 जून 2020 मध्ये चिरंजीवीचं निधन झालं. यानंतर मेघनाने सर्वकाही एकटीनेच सांभाळलं. लोकांचे टोमणे ऐकून हसणंच विसरून गेली, हसायला देखील खूप भीती वाटायची असं तिने म्हटलं आहे.

साऊथ इंडियन अभिनेत्री मेघना राज हिने आपल्या स्वप्नातील राजकुमार चिरंजीवी सरजासोबत एप्रिल 2018 मध्ये लग्न केलं होतं. मेघना आणि चिरंजीवी यांनी लग्नाआधी दहा वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. पण नशीबाला ते मान्य नव्हतं. 7 जून 2020 मध्ये चिरंजीवीचं निधन झालं. यानंतर मेघनाने सर्वकाही एकटीनेच सांभाळलं. लोकांचे टोमणे ऐकून हसणंच विसरून गेली, हसायला देखील खूप भीती वाटायची असं तिने म्हटलं आहे. हार्ट अटॅकने चिरंजीवीचं निधन झालं. त्यावेळी मेघना प्रेग्नेंट होती. 

मेघनाने एका मुलाखतीत एकटीने जगताना अडचणींचा कसा सामना करतेय त्याबद्दल खुलासा केला आहे. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचं सोल्यूशन द्यायचे. ती एकटीच रडत असायची. विधवा महिला जसं वागतात तसंच मी देखील वागावं अशी काहीची इच्छा होती. त्यांना त्यांचंच बरोबर वाटायचं. पण माझ्या जगण्याची पद्धत वेगळी होती, विचार वेगळे होते असं मेघनाने म्हटलं आहे. 

"मला अनेकदा मोठ्याने हसावसं वाटले पण मी घाबरायची"

"मी हसणंच विसरून गेली होती. जर मी असं केलं असतं तर लोकांनी मला जज केलं असतं. पतीच्या मृत्यूनंतर ही कशी खूश आहे यावर लोकांनी खूप चर्चा केली असती. काहींनी येऊन मला लोकांना चिरंजीवीच्या निधनाचा काहीच फरत पडतं नसल्याचं सांगितलं. मला अनेकदा मोठ्याने हसावसं वाटलं. पण मी घाबरायची. कारण लोक तुझं दु:ख संपलं का? असं विचारायला येतील अशी भीती वाटायची" अशा भावना मेघनाने व्यक्त केल्या.

" माझं नातं खोटं नव्हतं, मला त्रास झाला"

वाईट काळात अनेक स्वार्थी लोक देखील भेटले. ज्यांनी तिच्याकडे सर्वकाही आहे म्हणून तिचं सांत्वन करू नका असं सांगितलं. "मला मान्य आहे माझ्याकडे सर्वकाही आहे. एक चांगली सेटल्ड बॅकग्राऊंड फॅमिली आहे. मी आरामात आयुष्य जगू शकते. याचा अर्थ असा नाही की मी माणूस नाही. माझं नातं खोटं नव्हतं. मला त्रास झाला. लोक अशाप्रकारे कसं बोलू शकतात?" असा सवालही मेघनाने केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :चिरंजीवी