Join us

'घटस्फोटानंतर मी आयुष्याच्या सर्वात खालच्या स्तरावर...' समंथा रुथ प्रभूने व्यक्त केलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 11:54 AM

घटस्फोटानंतरचं आयुष्य, मायोसायटिस हा आजार आणि सध्याचं फ्लॉप करिअर ही तीनही कारणं तिच्यासाठी...

साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samatha Ruth Prabhu)आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांचा २०२१ साली घटस्फोट झाला. हा तेव्हाचा सर्वात चर्चेतला विषय होता. नुकतंच समंथाने एका मुलाखतीत घटस्फोटानंतरचं आयुष्य, मायोसायटिस हा आजार आणि सध्याचं फ्लॉप करिअर यावर भाष्य केलं. ही तीनही कारणं तिच्यासाठी ट्रिपल झटक्यापेक्षा कमी नव्हती. 

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत समंथा म्हणाली, "जेव्हा मी अयशस्वी संसाराच्या अतिशय खालच्या स्तरावर जाऊन पोहोचले होते आणि माझ्या कामावर, आरोग्यावर याचा परिणाम होत होता. अशावेळी मी त्या कलाकारांबाबत वाचलं जे या मानसिक तणावातून गेले आणि परत आले आहेत. तसंच ट्रोलिंगचा सामना केला आहे. त्यांच्या गोष्टी ऐकून मला मदत मिळाली. जर ते करु शकतात तर मीही करुच शकते असं मी ठरवलं."

ती पुढे म्हणाली, "या देशात एक आवडता कलाकार होणं म्हणजे एक गिफ्टच आहे. यासाठी जबाबदार, प्रामाणिक आणि वास्तविक व्हावं लागेल. कोणी किती ब्लॉकबस्टर किंवा सुपरहिट चित्रपट दिले, किती पुरस्कार जिंकले किंवा कोणाची बॉडी चांगली आहे, कोणाचा ड्रेस सुंदर आहे यावर हे अवलंबून नाही. माझ्यातील कमीपणा सार्वजनिक झालाय याची मला पर्वा नाही. मी खरं तर खूप स्ट्राँग आहे. मी माझ्या काही आजारांशी लढत आहे आणि मला माहितीये की जे लोक या स्थितीत असतील त्यांच्याकडेही लढायची ताकद असेल."

समंथाच्या वर्कफ्र्ंटबद्दल बोलायचं तर ती शेवटची विजय देवरकोंडासोबत 'खुशी' या सिनेमात दिसली. तर याआधी तिचा 'शाकुंतलम' सिनेमा रिलीज झाला होता. दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर फारसं यश मिळवू शकले नाहीत. समंथाने आता काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला आहे. ती आपल्या आरोग्याकडे लक्ष देत असून जगातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेत आहे.

टॅग्स :समांथा अक्कीनेनीघटस्फोट